Solapur IT Park: होटगीत आयटी पार्कचा मार्ग मोकळा

लॉजेस्टिक पार्कचा प्रस्ताव नामंजूर
IT Park
IT Parkfile
Published on
Updated on

सोलापूर : नियोजित आयटी पार्क हे होटगी येथील जलसंपदा जागेवरच होणार आहे. या जागेवर लॉजिस्टिक पार्कचा प्रस्ताव होता, तो कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाने नामंजूर केला आहे. त्यामुळे आता होटगी येथे आयटी पार्क उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या बैठकीमध्ये जलसंपदा विभागाची जागा आयटी पार्कसाठी औद्योगिक विकास महामंडळाकडे देण्याचा प्रस्ताव येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाला आयटी पार्कसाठी जागा शोधण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने होटगी येथील जलसंपदा खात्याची जागा निश्चित केली होत. सुरुवातीला जलसंपदा विभागाला साडेतीन कोटी रुपये भूसंपादनासाठी मोजावे लागणार होते; परंतु फडणवीस यांनी ती जागा मोफत उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

होटगी रोडवरील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची सध्या 20 केपीएलडी क्षमतेचा डिस्टिलरी प्रकल्प असून, त्यांचा हा प्रकल्प येत्या वर्षभरात 100 केपीएलडी क्षमतेचा होणार आहे. यात झीरो लिक्वीड डिस्चार्ज (झेएलडी) तंत्राचा वापर केल्याने मळीचा वास हा शून्यावर येणार आहे. होटगी रोडवरील विमानतळावरून उडणाऱ्या विमानसेवेच्या फनेलमध्ये प्रस्तावित आयटी पार्क इमारतीचा समावेश होत नाही. 50 मीटर उंचीपर्यंत बांधकाम करता येते.

याबाबत होटगी रोडवरील विमानतळ प्रशासनाचा अभिप्राय घेण्यात आला आहे. तसेच प्रस्तावित आयटी पार्क जागेवर सुमारे 40 ते 45 हजार जण बसून काम करतील इतकी क्षमता असणार आहे.

होटगी रोडवरील नियोजित आयटी पार्कसाठी उपलब्ध असलेली जागा ही जलसंपदा विभागाची आहे. त्या जागेवर लॉजेस्टिक पार्क उभारण्याचा प्रस्ताव रद्द झाला असून पुढील बैठकीत जागा हस्तांतरबाबत निर्णय होईल.
- एस. कार्तिकेयन जिल्हाधिकारी, सोलापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news