Solapur IT Park : होटगी येथील आयटी पार्कच्या जागेचा प्रस्ताव सादर

जिल्हा प्रशासन आता निर्णय घेणार असून, जागा वर्ग झाल्यानंतर प्रत्यक्षात कामकाजाला सुरुवात होणार
IT Park
IT Park
Published on
Updated on

सोलापूर : बहुप्रतीक्षित होटगी (ता. दक्षिण सोलापूर) येथील तलावाच्या जलसंपदा विभागाची ३५ एकर जमीन हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव तयार आहे. हा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे.

त्यामुळे जिल्हा प्रशासन आता त्यावर निर्णय घेणार असून, जागा वर्ग झाल्यानंतर प्रत्यक्षात कामकाजाला सुरुवात होणार आहे. राज्य शासनाने होटगी येथे आयटी पार्क मंजूर केले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून आयटी पार्कसाठी इमारतीची उभारणी होणार आहे. होटगी येथे जलसंपदा विभागाची एकूण ५० एकर जागा आहे. या जागेची मोजणी ८ ऑगस्ट रोजी पूर्ण झाली होती.

या जागेचा मोजणी नकाशा तयार व्हायला विलंब लागला. त्यामुळे हस्तांतरण प्रक्रिया थांबली होती. एकूण ५० एकर जागेपैकी १५ एकर जागा सांडव्यांसाठी आवश्यक आहे. ही १५ एकर जागा जलसंपदा विभागाकडे ठेवून उर्वरित ३५ एकर जागा एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्याचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news