

सोलापूर : ऑगस्ट महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील झालेल्या अतिवृष्टी आणि भीमा नदीला आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील 59 कोटी 79 लाख 16 हजार 125 रुपयांच्या शेतपिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात एकूण 59,110 शेतकरी बाधित झाले असून, 56,961.73 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. पिकांच्या उत्पन्नात घट झाली आहे. सर्वाधिक फटका उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्याला बसला आहे, त्यासाठी नुकसानभरपाई मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून सांगण्यात आले.
उजनी आणि वीर धरणातून भीमा, नीरा नदीत पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठी पूरस्थिती निर्माण होऊन केळी, उडीद, सोयाबीन, तूर यासह अन्य शेतपिकांचे नुकसान झाले होते. तसेच उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोटमध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे शासनाने पंचनामा करण्याचे आदेश दिले होते. बार्शी तालुक्यातील 95.10 हेक्टर क्षेत्रावरील 309 शेतकरी बाधित झाले असून 8 लाख 18 हजार पाचशे पन्नास रुपये, तर अप्पर मंद्रूप तहसील अंतर्गत 148.12 हेक्टर क्षेत्र आणि 284 शेतकरी बाधित झाले असून 13 लाख 99 हजार 420 रुपये, माढा तालुक्यातील 911.40 हेक्टर क्षेत्रावरील 1311 शेतकरी बाधित झाले असून, 1 कोटी 59 लाख 61 हजार 300 रुपयांची नुकसान झाले आहे. तसेच पंढरपूर तालुक्यातील 2785.54 हेक्टर क्षेत्रावरील 6 हजार 101 शेतकर्यांना याचा फटका बसला असून, 4 कोटी 70 लाख 50 हजार 180 रुपयांच्या पिकांचे नुकसान झाले आहेत.
मोहोळ तालुक्यातील 102.83 हेक्टर क्षेत्रावरील 130 शेतकरी बाधित झाले असून, 17 लाख 73 हजार 685 रुपये इतक्या रुपयांची मदतीची आवश्यकता आहे. मंगळवेढा तालुक्यातील 102.43 पिकांची नुकसान झाले असून 156 शेतकरी बाधित झाले आहेत, त्यासाठी 12 लाख 54 हजार 285 रुपये इतके नुकसान भरपाई लागणार आहे. माळशिरस तालुक्यातील 512.22 हेक्टरवरील पिके बाधित झाले असून, 971 शेतकर्यांना फटका बसला आहे. 90 लाख 17 हजार 390 रुपये निधी अपेक्षित आहे.
उत्तर सोलापूर तालुक्याला सर्वाधिक फटका बसला असून या तालुक्यातील संपूर्ण गावात 65 मिलिमीटर पेक्षा जास्त म्हणजे अतिवृष्टी झाल्यामुळे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उत्तरमध्ये 21 हजार 856 शेतकरी बाधित झाले असून 25036.46 हेक्टर क्षेत्र बाधित क्षेत्रांसाठी 26 कोटी 3 लाख 18 हजार 30 रुपये, तर अक्कलकोट तालुक्यातील 13289 बाधित शेतकर्यांच्या 15 हजार 352.64 बाधित क्षेत्रासाठी 14 कोटी 4 लाख 13 हजार 85 रुपये तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील 14 हजार 703 बाधित शेतकर्यांच्या 11 हजार 915 हेक्टर क्षेत्रावरील पिके ही बाधित झाली असून 11 कोटी 99 लाख दहा हजार दोनशे रुपये नुकसान झाले आहे. तसा नुकसानाची प्रस्ताव शासनाकडून पाठविण्यात आला आहे.