Solapur Rain: सोलापुरात मुसळधार पावसाच्या हजेरीने तारांबळ

शहरात 21 मि.मी. पाऊस
Solapur Rain |
सोलापूर : शहरात सायंकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी लष्कर परिसरात टिपलेले छायाचित्र.Pudhari Photo
Published on
Updated on

सोलापूर : सोलापूर शहरात शनिवारी सकाळी कडक उन्हानंतर सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास मुसळदार पाऊस पडला. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी साचले होते. शुक्रवारी रात्री पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शनिवारी दुपारपर्यंत कडक ऊन होते. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अचानक काळेकुट्ट ढग दाटून आले. वार्‍याचा वेग वाढून अचानक मुसळदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे एक तासभर पाऊस झाला.

शिवाजी चौक, नवी पेठ, जिल्हा परिषद, चौपाड, विजापूर वेस, बाळीेवेस, मधला मारुती, जुळे सोलापूरसह शहरातील अन्य भागांतील मुसळदार पावसामुळे उंचसखल भागांत पाणी साचले होते. रस्त्यावर सुमारे अर्धाफुटाने अधिक क्षमतेने पाणी वाहत होते. शहरात 21 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली.

सीनेला पुराचा धोका

सीना कोळेगाव धरणातून रविवारी दि. 30 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजल्यापासून पाण्याच्या विसर्गात वाढ करून सीना नदीच्या पात्रात 15 हजार 225.87 क्यूसेक्स इतका विसर्ग आहे. करमाळा, बार्शी, सोलापूर शहर, उत्तर सोलापूर तालुक्यातही पावसाची संततधार असल्याने सीना नदीला पुरस्थितीत आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news