Solapur heatwave: सोलापूरकरांची लाहीलाही; उन्हाचा पारा 42 अंशांवर

तापमानात किंचित घट, तरी झळा कायम
Heatwave
HeatwavePudhari
Published on
Updated on

सोलापूर : मे महिन्याच्या सुरुवातीलाच सोलापूर शहराने उन्हाचा कहर अनुभवण्यास सुरुवात केली आहे. आज रविवारी शहरातील कमाल तापमान 42.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर किमान तापमान 25.5 अंश सेल्सिअस नोंदले गेले. सकाळपासूनच आकाश निरभ्र असून प्रखर सूर्यप्रकाशामुळे दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला.

शनिवारच्या तुलनेत तापमानात किंचित म्हणजे 0.6 अंशांनी घट होऊन उन्हाच्या झळा कायम होत्या. शनिवारी 42.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते. गेल्या एप्रिल महिन्यापासून तापमानात सातत्याने वाढ होत असून, मागील 24 दिवसांपासून सोलापूरचा तापमान हा 40 अंशावर राहिला आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा तापदायक ठरला आहे.

अजूनही उष्णतेची लाट कायम असून तप्त उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. पुढील आठवडाभर उष्णतेची लाट ही कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हवेतील कोरडेपणा वाढल्याने उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे. उन्हाची तीव्रता पाहता नागरिकांनी दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे. बाहेर जाताना डोक्यावर टोपी, गॉगल व सुती कपडे वापरावेत. भरपूर पाणी, ताक, लिंबू सरबत प्यावे. लहान मुले व वृद्धांची विशेष काळजी घ्यावी. उष्माघाताची लक्षणे दिसल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news