Solapur weather: मान्सूनपूर्व पाऊस पडूनही उन्हाचे चटके कायम

रविवारी 39.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
Weather Update
Weather UpdatePudhari
Published on
Updated on

सोलापूर : मे महिना संपत आला तरी उन्हाचे चटके सुरूच आहेत. शनिवारी, दि. 23 मे रोजी दिवसभर 40 अंश सेल्सिअस तापमान नोंदल्यानंतर रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. परंतु दुसऱ्या दिवशी रविवारी दि. 24 मे रोजी उन्हाचे चटके मात्र कायम होते. 39.8 अंश सेल्सिअस इतकी तापमान नोंदले गेले.

सोलापूर शहर परिसरात शनिवारी सायंकाळी सात ते रविवारी पहाटेपर्यंत भाग बदलून मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला होता. दुपारी 12 वाजेपर्यंत ढग आणि उन्हाचा खेळ चालू होता. त्यानंतर पुन्हा तापमानात वाढ होत उन्हाच्या चटके बसण्यास सुरुवात झाली.

यंदा मान्सूनवर एल निनोचा प्रभाव होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला. या मान्सूनमध्ये सरासरीच्या 12 टक्के पाऊस कमी पडण्याचा अंदाज वर्तविल्याने आणि 17 मे 15 जून या कालावधीत अधिक मास असल्याने पाऊसमान कमी होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांनी मोठ्या पावसाची अपेक्षा व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news