Solapur : हातातील पिशवीतून अडीच लाखांची रोकड लांबवली

Handbag theft: मोहोळमधील बँक ऑफ इंडिया समोरील घटनेने खळबळ
Solapur robbery
Solapur : हातातील पिशवीतून अडीच लाखांची रोकड लांबवलीfile photo
Published on
Updated on

पोखरापूर : मोहोळ येथील बँक ऑफ इंडिया शाखेतून कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी ठेकेदाराने काढलेल्या अडीच लाख रुपयांवर दोन अज्ञात महिलांनी डल्ला मारला. ही घटना मंगळवारी (दि.१४) दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान बँक ऑफ इंडिया शाखेच्या बाहेर घडली. याप्रकरणी दोन अज्ञात महिलांच्या विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जगदीश भागवत कावळे (रा. साठेनगर, मोहोळ) हे कोठारी पाईप कंपनी चंद्रमौळी वसाहत येथील कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत आहेत. कंपनीतील कामगारांचा पगार करण्यासाठी ते मुलाला घेऊन बँकेत गेले होते. बँकेतून दुपारी २. ३० च्या दरम्यान अडीच लाखांची रोकड काढून ती कॅरीबॅगमध्ये गुंडाळून ठेवली. पैशांची पिशवी त्यांचा मुलगा भावेश दुचाकीवर पाठीमागे घेऊन बसला होता.

दरम्यान, ते दोघे कन्या प्रशाला येथील ब्रिज खाली कामगारांचे पैसे देण्याकरता गेले. यावेळी पैशांची पिशवी तपासून पाहिली असता त्यामधील अडीच लाख रुपये आढळून आले नाहीत. त्यानंतर तत्काळ कावळे यांनी बँक ऑफ इंडिया शाखेत जाऊन कर्मचाऱ्यांच्या मदतीने सीसीटीव्ही फुटेज पाहिले. त्यात अज्ञात दोन महिला मुलाच्या हातातील पिशवीतून पैशांची चोरी करत असल्याचे दिसून आले. त्यानुसार जगदीश कावळे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दोन अज्ञात महिलांच्या विरोधात चोरीप्रकरणी गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुळ करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news