Solapur Rain: सोलापुरात गारांचा पाऊस

दिवसभराच्या कडक उन्हानंतर सायंकाळी पावसाची हजेरी
Solapur Rain
Solapur RainPudhari
Published on
Updated on

सोलापूर : शहरात दिवसभर कडक ऊन, उकाडा होता. मात्र, सायंकाळी साडेचारच्या सुमारास गारव्यासह पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना सायंकाळी दिलासा मिळाला.

शहर, जिल्ह्याचा पारा गेल्या काही दिवसांपासून 43 अंशांवर पोहोचला होता. अशातच गेल्या चार दिवसांपासून सोलापुरात अवकाळी पाऊस सुरू झाला आहे. मंगळवारी (दि. 21) ऊन कमी असले, तरी प्रचंड उकाड्याने दिवसभर सोलापूरकरांची अंगाची लाहीलाही होत होती. नागरिक पंखे, कूलरचा आधार घेत होते. सायंकाळी मात्र वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. त्यामुळे उष्ण दाहकतेने तप्त झालेल्या सोलापूरकरांना गारव्याचा सुखद अनुभव मिळाला. नागरिक गारा हातात पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसले.

या भागात पडला पाऊस

नई जिंदगी, नवी पेठ, शेळगी, जुळे सोलापूर, सैफूल, सात रस्ता, नीलम नगर, बाळेसह अन्य भागांत सायंकाळी दमदार पावसाने हजेरी लावली. काही भागांत झालेल्या गारांच्या पावसात लहान मुलांनी भिजण्याचा आनंद घेतला. तर घरात व दुकानात उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांनी गारव्यामुळे सुस्कारा सोडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news