Solapur Theft News : सोने चोरी करणार्‍या चार महिला पोलिसांच्या ताब्यात

10 लाख रुपये किमतीचे 10 तोळे वजनाचे सोन्याच्या दागिन्यांची केली होती चोरी
Solapur Theft News  |
Solapur Theft News : सोने चोरी करणार्‍या चार महिला पोलिसांच्या ताब्यातFile Photo
Published on
Updated on

अकलूज : अकलूज बस स्थानकातून पुणे येथे निघालेल्या महिलेच्या पर्स मधून गर्दीचा फायदा घेत 10 लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी करणार्‍या 4 महिलांना अकलूज पोलिसांनी अटक केली.

याबाबत अकलूज पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि, दि. 4 ऑगस्ट रोजी दुपारी 01.30 वाजन्याच्या सुमारास फिर्यादी महिला या अकलुज बस स्थानक येथुन बसने पुणे येथे जाण्यासाठी निघाले होते. बस मध्ये चढताना गर्दीमध्ये कोणीतरी अज्ञाताने फिर्यादी यांच्या पर्समधील सोन्याच्या बांगड्या व गंठन असा अंदाजे 10 लाख रुपये किंमतीचे 10 तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे चोरी केले होते. त्यावरुन अकलुज पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली होती.

सदर गुन्हा नोंद होताच गुन्हे प्रकटीकरण पथकाने तत्काळ अकलुज बस स्थानक, अकलूज नगरपरिषद सीसीटीव्ही व रस्त्यावरील दुकानाची सीसीटीव्ही कॅमेर्‍याची पाहणी केली. असता 4 संशयीत महिला या रिक्षाने टेंभुर्णी रोडने गेल्याचे दिसुन आले. अकलुज ते टेंभुर्णी रोडवरील तसेच टेंभुर्णी शहरातील असे एकुण 30 ते 35 सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करुन व त्यांचे तांत्रिक विश्लेषण करुन त्याव्दारे टेंभुर्णी येथुन पळून जाण्याच्या तयारीत असताना महिला एकता कैलास उपाध्ये (वय -24 वर्षे, राहणार मेडिकल कॉलेज शेजारी बापुनगर, सेडमनगर, कलबुर्गी सध्या राहणार - वॉटर सप्लाय जवळ फुलेनगर, येरवडा पुणे), ननीता दिनेश कांबळे (वय - 35 वर्षे), सुनिता शाखा सकट वय -45 वर्षे), आरती मेघराज उपाध्य (वय 30 वर्षे सर्वजण राहणार वॉटर सप्लाय जवळ, फुलेनगर, येरवडा पुणे) यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

सदर महिला या सराईत असून यांच्यावर यापूर्वी आंळद पोलिस ठाणे राज्य कर्नाटक, वाई पोलिस ठाणे जिल्हा सातारा, वारजे माळेवाडी, शिवाजीनगर पोलिस ठाणे पुणे शहर असे वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news