Solapur gas leak: दोन चिमुकल्यांसह आजीचा दुर्दैवी मृत्यू

सोलापुरातील गॅस गळती प्रकरण; दाम्पत्याची रुग्णालयात मृत्यूशी झुंज
Solapur gas leak |
Solapur gas leak: दोन चिमुकल्यांसह आजीचा दुर्दैवी मृत्यू(File Photo)
Published on
Updated on

सोलापूर : सोलापुरातील बेडर पूल येथे रविवारी सकाळी एका घरातील पाचजण गॅस गळतीमुळे बेशुद्ध अवस्थेत आढळून आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना दोन लहान मुलांचा रविवारी रात्री उशिरा मृत्यू झाला, तर त्यांच्या साठ वर्षीय आजीचा सोमवारी (दि. 1) दुपारी मृत्यू झाला. तिघांवर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. सध्या या कुटुंबातील युवराज आणि रंजनाबाई या पती-पत्नीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बेडर पूल येथील रहिवासी युवराज मोहनसिंग बलरामवाले (वय 40), रंजनाबाई युवराज बलरामवाले (35), हर्ष बलरामवाले (6), अक्षरा बलरामवाले (4) आणि विमल मोहनसिंग बलरामवाले (60) हे शनिवारी घरात झोपले असता रविवारी सकाळी बेशुद्ध अवस्थेत आढळून आले होते. गॅस गळतीमुळे पाचही जण अत्यवस्थ झाले होते.

बलरामवाले यांचे घर अतिशय दाटीवाटीचे होते. आतून घराला कडी होती. सकाळी बराच वेळ झाला, तरी कोणी घराबाहेर येत नसल्याचे पाहून नातेवाईकांनी पत्रा उचकटून आत प्रवेश केला. बेशुद्ध कुटुंबीयांना तातडीने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.

प्राथमिक तपासात गॅस गळतीमुळे हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता आहे. पाचजणांंपैकी तिघांचा मृत्यू झाला असून, दोघांवर उपचार सुरू आहेत. तिघांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली असून, व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतरच अधिकृत माहिती समोर येईल.
- नामदेव बंडगर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सदर बझार पोलिस ठाणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news