

सोलापूर : शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यांचे कार्य हे केवळ सोलापूरनगरीपुरते मर्यादित नव्हते तर सबंध कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि संपूर्ण भारतभूमीवर त्यांनी समाजोपयोगी कार्य केले. याची माहिती देशभरातील शिलालेखांवरती आहे. या माहितीवरचे ग्रंथ कर्नाटकातील एक सिद्धरामेश्वर भक्त सोलापूरमध्ये मोफत देत आहेत.
डॉ. संजीव कुलकर्णी असे या सिद्धरामेश्वर भक्तांचे नाव असून ते मूळचे धारवाड, कर्नाटकचे रहिवासी आहेत. पेशाने ते स्त्रीरोग तज्ज्ञ असून त्यांची सिद्धरामेश्वरांवरती खूप श्रद्धा आहे. ‘इनस्क्रिप्शन्स फ्रॉम सोलापूर डिस्ट्रिक्ट’ हा ग्रंथ ते शहरवासीयांना मोफत देत आहेत.
या ग्रंथाचे लेखक इतिहास आणि पुरातत्व शास्त्रज्ञ कर्नाटक विद्यापीठाचे इतिहास विभाग प्रमुख कै.डॉ. श्रीनिवास रीत्ती व सोलापूरचे पुरातत्व अभ्यासक कै. आनंद कुंभार यांनी केले आहे. दगडी शिलालेखांचे ठसे घेत त्याचे वाचन करून त्यामध्ये काय लिहिलेले आहे? याची विस्तृत माहिती या ग्रंथामध्ये आहे.