.jpeg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpeg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सोलापूर : ट्रॅक्टर खरेदीच्या व्यवहारात ठरलेली रक्कम न देता त्यातून ४४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौरव पोपट बोदरे (रा. पुरंदर, पुणे) व पुष्कर शंकर पाराडे (रा. उत्कर्षनगर, सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नाव आहेत. काशीनाथ मनोहर घुगरे (रा. भवानी पेठ, सोलापूर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांचे शहरातील बाळे येथे श्री ट्रेडर्स नावाचे शेतीचे व एस ट्रॅक्टरचे शोरूम आहे.
गौरव बोदरे व पुष्कर पाराडे यांनी त्यांच्या शोरूममधून ८६ लाख ३२ हजार रुपयांचे १३ ट्रॅक्टर सह्याद्री ट्रॅक्ट्रर अँड इक्विपमेंट येथे नेऊन विकले. त्या बदल्यात ४१ लाख २९ हजार रुपये दिले. उरलेले ४४ लाख २ हजार दिले नाहीत. मे २०२४ ते जुलैदरम्यान वेळोवळी उरलेली रक्कम घुगरे यांनी मागितली; परंतु संशयित आरोपींनी रक्कम परत न देता केवळ आश्वासने दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच घुगरे यांनी पोलिसांत धाव घेतली.