Solapur Fraud : बनावट कागदपत्रांद्वारे ५६ लाखांची फसवणूक

शहरातील सत्यसाई नगर भागातील प्लॉट्सची बनावट कागदपत्रे तयार करून परस्पर मालकी हक्क नोंदवून घेत फसवणूक
Fraud Case
Fraud CasePudhari
Published on
Updated on

सोलापूर : शहरातील सत्यसाई नगर भागातील प्लॉट्सची बनावट कागदपत्रे तयार करून परस्पर मालकी हक्क नोंदवून घेत ५६ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सोलापूरच्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसवराज आप्पाराव शेगावकर (रा. राघवेंद्र नगर, मजरेवाडी, सोलापूर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून जगन्नाथ मन्नाप्पा आगणूर, यास्मिन कलिम मुजावर, रंगय्या क्रिश्तय्या दासरी, महिबूब मशाक मुल्ला, जाकीर अमीन दुरुगकर, महेश सिद्राम सर्वगोड (सर्व रा. सोलापूर) यांच्‍यावर गुन्‍हा दाखल करण्यात आला.

फिर्यादी शेगावकर यांच्या मालकीच्या ७ प्लॉट्सचे आरोपींनी संगनमत करून बनावट दस्तावेज तयार केले. २०२० आणि त्यानंतरच्या काळात महानगर पालिकेत मिळकत नोंद लावली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसात धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गाढवे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news