Solapur News : ऑफिसमध्ये घुसून चौघाजणांकडून तरुणास मारहाण

जेलरोड पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
Crime News
ऑफिसमध्ये घुसून चौघाजणांकडून तरुणास मारहाणFile Photo
Published on: 
Updated on: 

सोलापूर : पूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून ऑफिसमध्ये काम करीत असलेल्या तरुणास चौघांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी जेलरोड पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

म्हाळप्पा देवदास हेळवी (रा. ओम गर्जना चौक,) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. वीरभद्र कांते, यश कांते, प्रभात प्रकाश फणसे आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. १४ ऑक्टोबर रोजी रात्री फिर्यादी सोलापूर शहर पेट्रोलपंप येथील ऑफिसमध्ये काम करीत होते. त्यावेळी सायंकाळी झालेल्या वादाचा राग मनात धरून आरोपी तेथे आले. त्‍यांनी फिर्यादीला मारहाण केली. तसेच ऑफिसमधील साहित्यांचे नुकसान करून जीवे मारण्याची धमकी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news