Solapur Food Adulteration: अद्याप ‘२०१’ चा अहवालच नाही

भेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई रखडली
Food adulteration
Food adulterationPudhari
Published on
Updated on

सोलापूर : शहर व जिल्ह्यात भेसळयुक्त अन्नपदार्थांवर आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने २५ मे ते ३० जून कालावधीत विशेष तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान दुग्धजन्य पदार्थांचे १८ नमुने तपासणीसाठी अधिकृत प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. तर अन्न, तेल, दूध, दूध पावडर असे एकूण २०३ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून, यातील २ नमुन्यांचा अहवाल प्रमाणात आला आहे. तर २०१ नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.

प्रयोगशाळांमध्ये मनुष्यबळाची कमतरता आणि नमुन्यांचा वाढता भार यामुळे अद्याप एकाही नमुन्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे दोषींवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात विलंब होत आहे. या कालावधीत विभागाने ११२० रुपये किंमतीचा ४ किलो खवा, ५ लाख ७४ हजार रुपये किंमतीची १,१४८ किलो मिल्क पावडर जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या पदार्थांची गुणवत्ता तपासण्यासाठी नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाकडून राज्यात कारवाई सुरु आहे. दुग्धजन्य पदार्थ, मिठाई, खवा, पनीर, तूप, दूध व इतर खाद्यपदार्थांची तपासणी केली जात आहे. मात्र प्रयोगशाळेत नमुन्यांचा प्रलंबित भार वाढल्यामुळे अहवाल मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे कारवाईचा वेग मंदावल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news