

सोलापूर : हिप्परगा तलाव ओव्हरप्लो झाला आहे. यामुळे सांडव्याच्या माध्यमातून येणार्या पाण्यामुळे शहरातील नाले देखील ओसंडून वाहत आहे. त्यामुळे यश नगर भाग एक, वसंत विहार, मडकी वस्ती, गणेश नगर, अवंती नगर भागातील रहिवाशांना पाण्याचा धोका वाढला आहे.
यश नगर भाग एक नाल्यात पाणी आले आहे. रात्रीतून पाण्याची पातळी वाढल्यास मदत कार्यासाठी महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा, अग्निशामक दल परिसरात तैनात करण्यात आले आहेत. सोलापूर शहरातील नाले बुधवारी काळपासून ओसंडून वाहत आहे. दुपारपर्यंत वसंत विहार जवळील नाला काटोकाट भरून वाहत होता. सायंकळी पाण्याचा प्रवाह वाढला. त्यामुळे या भागात पुरपस्थिती निर्माण झाली आहे. आर्यनंदी नगर. गणेश नगर, मडकी वस्ती भागात पाणी शिरत असल्याने या भागात महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेने आडवी चर मारून घरामध्ये शिरलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी वाट करून दिली आहे.
वंसत विहार पुलाजवळ शेजारील रस्त्यांवर पाणी आले आहे. दोन ते तीन फूट पाणी आले आहे. 54 मीटर रस्त्यांवरील रेल्वेचा बोगद्यामध्ये तब्बल पाच ते सहा फूट पाणी साठले आहे. त्याशिवाय सोळा कमान, चौदा कामन परिसरात नाल्याचा प्रवाह सोडून पाणी वाहत आहे. त्यामुुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. हे पाणी यशनगर भाग दोन मधील लाईन दोन पर्यंत शिरले आहे. रात्रीतून पाणी वाढण्याची शक्यता आहे. महापालिकेने आपत्कालीन यंत्रण सज्ज ठेवली आहे.
पाणी वाढल्यास 27 नंबर शाळेत स्थलांतर
रात्रीतून पाणी वाढल्यास पाणी शिरलेल्या भागातील नागरिकांना महापालिकेच्या 27 नंबर शाळेमध्ये स्थालांतर करण्याची सोय महापालिकेच्या वतीने करण्यात आली जाणार आहे.