Solapur Tobacco Seizure : पावणेपाच लाखांची सुगंधी तंबाखू हस्‍तगत

दोन आरोपींवर गुन्हे दाखल
Solapur Tobacco Seizure : पावणेपाच लाखांची सुगंधी तंबाखू हस्‍तगत
Published on: 
Updated on: 

सोलापूर : ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोहोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि अवैध दारूचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण चार लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, दोन आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्‍या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक विशाल मुळे यांचे पथक मोहोळ परिसरात गस्त घालत असताना पोलिस हवालदार घाडगे व थोरात यांना मोहोळ जवळील मांडवे वस्ती येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये प्रतिबंधित सुगंधी तंबाखूचा साठा लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन विभाग आणि मोहोळ पोलिसांना सोबत घेऊन मांडवे वस्ती येथे छापा टाकण्यात आला. या छाप्यात सुधाकर प्रभू मांडवे (रा. मांडवे वस्ती, मोहोळ) याच्या ताब्यातून तब्बल चार लाख ६४ हजार रुपयांची ९८० किलो प्रतिबंधित सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आली. त्‍याच्‍यावर मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला. दरम्‍यान, पोखरापूर येथे अवैध दारूविक्री करणाऱ्या दादासाहेब राजाराम नरोटे याच्यावरही पोलिसांनी कारवाई केली. त्याच्याकडून १५ हजार रुपये किंमतीची देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आली.

ही धडक कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय अधिकारी सूरज गताप, पोलिस निरीक्षक संजय जगताप, दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल मुळे, मनोज भंडारी, पंकज महिंद्रकर, सिध्दाराम कंटोळी, व्‍यंकटेश मोरे, राहुल दोरकर, हरिष थोरात, बाळराजे घाडगे यांनी पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news