Solapur News : पाच उपजिल्हा रुग्णालयाचे काम सुरू

करमाळा, पंढरपूर, अक्कलकोट, बार्शी, टेंभुर्णी, अनगरला सुविधा
Solapur News
पाच उपजिल्हा रुग्णालयाचे काम सुरू
Published on
Updated on

आमसिद्ध व्हनकोरे

सोलापूर : जिल्ह्यात करमाळा, पंढरपूर, अक्कलकोट, बार्शी व टेंभुर्णी अशा पाच ठिकाणी उपजिल्हा तर, अनगरमध्ये नवीन ग्रामीण रुग्णालय मंजूर असून त्याचे बांधकामही सुरू झाले आहे. नव्याने 550 तर अनगरच्या ग्रामीण रूग्णालयात 30 असे एकूण 580 खाटांची वैद्यकीय सेवा नागरिकांना मिळण्यास मदत होईल. या माध्यमातून सामान्य नागरिकांना उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा मिळणार आहे.

शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत करमाळा, पंढरपूर, बार्शी, अक्कलकोट, टेंभुर्णी (ता. माढा) येथील नागरिकांना जवळच्या ठिकाणी वैद्यकीय सेवा मिळावी, म्हणून नव्याने उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले असून बांधकामही सुरू आहे. करमाळा, बार्शी आणि टेंभुर्णी येथील बांधकाम निम्म्याहून अधिक झाले असून अन्य ठिकाणची कामे देखील सुरू आहेत. हे उपजिल्हा रुग्णालय सुरू झाल्यास वैद्यकीय सुविधा मिळण्यास मोठी मदत होणार आहे. पंढरपूर व अक्कलकोटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने भाविकांच्या आरोग्याच्या प्रश्न उदभवल्यास मोफत वैद्यकीय उपचार मिळण्याची सोय होईल. पंढरपुरात 200 खाटांचे श्रेणीवर्धन रुग्णालय उभारले जात आहे. यापूर्वी 100 खाटांच्या माध्यमातून आरोग्य सेवा येथे दिली जाते. तसेच बार्शी आणि अक्कलकोट येथील रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करूनच 30 खाटावरून 100 खाटांचे रुग्णालय उभारले जात आहे. पाचही आरोग्य संस्था पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर गावापासून जवळच शासकीय आरोग्य संस्थेत मोफत उपचार मिळणार असल्याने यापुढील काळात येथील शासकीय रूग्णालयावरील रूग्णांचा ताण कमी होणार आहे.

पाचही आरोग्य संस्थेचे काम पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील बाह्यरुग्ण विभागाशिवाय व आंतररुग्ण विभागातील 580 खाटांच्या माध्यमातून वैद्यकीय उपचाराची सुविधा पूर्णपणे मोफत मिळेल. तसेच किरकोळ शस्त्रक्रियादेखील याच ठिकाणी होतील.
- डॉ. वर्षा डोईफोडे, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, सोलापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news