Solapur Crime: दहशत पसरवून गुन्‍हे करणारी पाचजणांची टोळी तडीपार

गुन्‍हेगारांमध्ये भितीचे वातावरण
तडीपार
तडीपार
Published on
Updated on

सोलापूर : सोलापूर शहरातील कुमठा नाका परिसरात दहशत पसरवून गुन्‍हे करणाऱ्या पाचजणांच्‍या टोळीस शहर पोलिस उपायुक्‍त प्रितम यावलकर यांनी सोलापूर शहर व जिल्‍ह्यातून दोन वर्षाकरीता तडीपार केले. त्‍यांच्‍या दणक्‍याने गुन्‍हेगारांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

टोळीप्रमुख राजू मोहन जमादार (वय ४१), कृष्णा राजू जमादार ( २०), सनी राम जमादार (२०), राम शंकर जमादार (४३, चौघे रा. हुच्‍चेश्वर नगर भाग ३, कुमठा नाका, सोलापूर) आणि दीपक रामशंकर जमादार (१९, रा. शिवगंगानगर भाग ४, कुमठा नाका, सोलापूर) अशी तडीपार केलेल्या टोळीतील गुन्‍हेगारांची नावे आहेत. त्‍याच्‍या विरोधात २०२३ ते २५ दरम्‍यान टोळीच्‍या माध्यमातून दुखापत करणे, दंगा करणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे, घातक शस्‍त्र बाळगून दहशत निर्माण करणे यासारखे गुन्‍हे दाखल आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news