

सोलापूर : नगरपरिषद, नगरपंचायत आणि नगरपालिका हद्दीतील शासकीय आरोग्य संस्थासह ५६६ रुग्णालयांना आपत्कालीन अग्नि सुरक्षा परीक्षण (फायर ऑडिट) अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांनी दिले.
जिल्ह्यात ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांची संख्या २१ आहे. या सर्व २१ रुग्णालयांसह तसेच खासगी अशा मिळून ५६६ रुग्णालयांत आगीच्या घटना घटल्यास आपत्कालीन स्थितीत कोणत्याही प्रकारचे हानी होऊ नये, यासाठी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार अग्नि सुरक्षा परीक्षण किवा आगीपासून सुरक्षेचे मूल्यांकन (फायर ऑडिट) करण्याची सक्त सूचना देण्यात आली आहे. शिवाय, या सर्व रुग्णालयांना कालावधीही ठरवून देण्यात आले आहे.