सोलापूर : टेंभुर्णी शहरात दिवसा-ढवळ्या भाजीविक्रेत्या तरुणावर जीवघेणा हल्ला

सोलापूर : टेंभुर्णी शहरात दिवसा-ढवळ्या भाजीविक्रेत्या तरुणावर जीवघेणा हल्ला
Published on
Updated on

टेंभुर्णी; पुढारी वृत्तसेवा : टेंभुर्णी शहरात दिवसा-ढवळ्या भाजीविक्रेत्या तरुणावर रिवाल्वरने गोळीबार करुन कोयत्याने वार केल्याची घटना घडली. या जीवघेण्या हल्ल्यात तरुण जखमी झाला आहे. राहुल पवार असे जखमी तरुणाचे नाव आहे. या भयंकर घटनेने टेंभुर्णीसह परिसर हादरून गेला. रविवारी दुपारी पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

दरम्यान टेंभुर्णी शहरातील हायवेवर हॉटेल जगदंबा शेजारी राहुल महादेव पवार या तरुणाचे व्हेजिटेबल अँड फ्रुट या हे भाजीचे दुकान आहे. आज दुपारी पाच वाजताच्या सुमारास त्याच्यावर गोळीबार करून कोयत्याने जबर हल्ला करण्यात आला. दिवसा-ढवळ्या व अत्यंत रहदारी असलेल्या ठिकाणी गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली आहे.जखमीवर टेंभुर्णी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

राहुल पवार यांच्या मांडीत गोळी घुसली असून डोक्यात तीक्ष्ण हत्याराने मारहाण झाली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. हा हल्ला आर्थिक देवाण-घेवाणीतून झाला असावा असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील,पोलीस निरीक्षक दीपक पाटील,सपोनि गिरीष जोग,पोसई सोनटक्के आदींनी धाव घेतली आहे.या घटनेनंतर शहरात शांतता असून भीतीचे वातावरण पसरले आहे.रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.या घटनेत चार-पाच आरोपींचा समावेश असावा अशी माहिती ही समोर येत असून या घटनेतील काही आरोपींना पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news