Solapur Farmer Protest| ऊस दरासाठी शेतकऱ्यांचा जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर रात्री उशिरापर्यंत ठिय्या

पहिली उचल ३५०० देण्याची मागणी; हजारो शेतकऱ्यांचा समावेश
Solapur Farmer Protest
Solapur Farmer Protest
Published on: 
Updated on: 

सोलापूर : यंदाच्या गळीत हंगामात उसाला जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी पहिली उचल प्रति टन ३५०० रुपये मिळावे या प्रमुख मागणीसाठी स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेच्‍या वतीने सोमवारी (दि. १६) जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. याकडे जिल्‍हा प्रशासनाने दुर्लक्ष केल्‍याने शेतकऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरुच ठेवले. यावेळी स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा तथा माजी खा. राजू शेट्टी, रासपचे नेते महादेव जानकर यांची प्रमुख उपस्‍थिती होती.

जिल्‍ह्यातील कारखान्‍यांनी आतापर्यंत सतरा लाख टन उसाचे गाळप केले. मात्र, फक्‍त ३१०० रुपये भाव जाहीर केला. त्‍यामुळे स्‍वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, सोमवारी जिल्‍हाधिकारी कार्यालयावर चार हुतात्मा पुतळ्यापासून मोर्चा काढला. त्‍यानंतर संघटनेचे पदाधिकारी आणि जिल्‍हाधिकारी यांच्‍यात बैठक झाली. बैठकीत पदाधिकाऱ्यांने प्रति टन ३५०० रुपये पहिली उचल मिळावी, त्‍यानंतर दिवाळीत दोनशे आणि साखरेचे भाव ४५०० रुपयेपेक्षा जास्‍त गेल्‍यावर आणखी दोनशे रुपये मिळावेत, अशी मागणी केली. त्‍यावेळी जिल्‍हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी साखर कारखानदारांशी चर्चा करुन पुन्‍हा बैठक घेऊन दराविषयी निर्णय देण्याचे आश्वासन दिले. मात्र, यावर तोडगा न निघाल्‍याने रात्री उशिरापर्यंत जिल्‍हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरुच होते.

राज्‍यातील शेतकऱ्यांचे नुकसान

ऊस दर जाहीर करण्याच्‍या आदीच जिल्‍ह्यातील कारखानदारांनी १७ लाख टन ऊस गाळप केले. तर मिळेल त्‍या दराने साखरेची विक्री केल्‍याने साखरेचे दर पडले. त्‍यामुळे राज्‍यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्‍यास शेतकऱ्यांसह साखर कारखानदार जबाबदार असल्‍याचा आरोप माजी खा. शेट्टी यांनी केला.

शेतकऱ्यांना पहिली उचल ३५०० रुपये मिळावी यासाठी जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत मागणी मान्‍य होत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही.
- राजू शेट्टी, माजी खासदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.