Gokul Sugar Factory : थकीत बिलासाठी गोकुळ कारखाना बंद पाडला

धाराशिव, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश
Gokul Sugar Factory : थकीत बिलासाठी गोकुळ कारखाना बंद पाडला
Published on: 
Updated on: 

​सोलापूर : थकीत ऊस बिले आणि परवान्याविना सुरू असलेल्या गाळपाच्या निषेधार्थ संतप्त शेतकऱ्यांनी दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील धोत्री येथील गोकुळ शुगर प्रा.लि. (सध्या ओंकार ग्रुप) हा साखर कारखाना बंद पाडला आहे. या आंदोलनात धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असून, आंदोलकांनी थेट कारखान्यावर ठाण मांडल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्‍या वतीने १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सोलापूर विभागाचे प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांना निवेदन देऊन कारखान्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्‍यानंतर शुक्रवारी (दि.२०) धाराशिव व सोलापूर जिल्‍ह्यातील शेतकऱ्यांनी कारखान्‍यांवर जाऊन कारखाना बंद पाडला आहे.

कारखान्याने यापूर्वीही विनापरवाना गाळप करून शेतकऱ्यांना त्रास दिला आहे. सध्याच्या गाळप हंगामासाठी गाळप परवाना घेतलेला नसतानाही कारखान्याचे गाळप सुरू आहे. ज्या कारखान्यांनी पूर्वपरवानगी घेतलेली नाही, त्यांची यादी जाहीर करून संबंधित कारखाना प्रशासनावर गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी शेतकरी नेते अरविंद घोडके, गंगाधर जाधव, शिवाजी फडतरे, संभाजी सुरवसे, मोहसीन शेख आदी शेतकरी उपस्‍थित होते.

बिले देण्याची मागणी

गोकुळ शुगर कारखान्याकडून २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या काळातील थकीत ऊस बिले अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाहीत. ही थकीत ऊस बिले शेतकऱ्यांच्या हातात पडेपर्यंत कारखाना सुरू करू देऊ नये, असा ठाम पवित्रा घेत शेतकऱ्यांनी घेत कारखाना बंद पाडून ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.