

सोलापूर ः मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनी दाखल केलेल्या अर्जांमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. राज्यभरातून हजारो लाडक्या बहिणींच्या अर्जामध्ये त्रुटी आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सात हजार 674 तर महापालिका हद्दीतील एक हजार 931 असे एकूण नऊ हजार सहाशे पाच अर्जांमध्ये त्रुटी आढळल्याने या बहिणींचा हिरमोड झाला आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण या बहुचर्चित योजनांचा राज्यातील लाखो लाडक्या बहिणींनी लाभ घेतला. सुरुवातीस योजनांवर शंका व्यक्त करत ज्यांनी अर्ज दाखल करणे टाळले होते. त्या बहिणींनी आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरलेल्या आहेत. पण, आता प्रशासनातील अधिकार्यांनी प्रत्येक अर्जाची कसून तपासणी करत आहेत. त्यामुळे अर्जातील त्रुटी लक्षात येत आहेत. यामुळे, दाखल अर्जदार महिलांचा हिरमोड होत आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्वाधिक 1613 सर्वात कमी बार्शीतील 336 अर्जांना त्रुटी लागलेल्या आहेत. शहरातील महिपालिका हद्दीतील एक हजार 931 अर्जही त्रुटीच्या कात्रीत अडकलेल्या आहेत.