Solapur News: अतिक्रमण काढताना महिलेचे गाडीसमोर लोटांगण

टपरी चालकांची अरेरावी; दोन खोकी, एक दाल चावलची गाडी हटवली
Solapur News
Solapur News: अतिक्रमण काढताना महिलेचे गाडीसमोर लोटांगणPudhari
Published on
Updated on

सोलापूर : सोलापूर महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक पथकाच्यावतीने गुरुवारी पुन्हा कस्तुरबा मंडई आणि बाळीवेस परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. यावेळी टपरी चालकांनी अरेरावी केली तर एका महिलेने थेट महापालिकेच्या गाडीसमोर लोटांगण घातले. या ठिकाणी विरोधाला न जुमानता अखेर कारवाई पूर्ण करण्यात आली. दोन खोकी, एक दाल चावलची गाडीचे अतिक्रमण काढण्यात आले.

महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाची शहरभर धडक कारवाई सुरू आहे. गुरुवारी बाळीवेस कस्तुरबा मार्केट परिसरात करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव कारवाईदरम्यान टपरी चालक व फेरीवाले यांनी थेट महापालिका अधिकाऱ्यांसोबत अरेरावी करत कारवाईला विरोध केला. यावेळी एका दालचावल गाडी चालवणाऱ्या महिलेने महापालिकेच्या वाहनासमोरच लोटांगण घालत कारवाई रोखण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला.

कस्तुरबा मार्केट हा शहरातील वर्दळीचा भाग असून येथे मोठ्या प्रमाणावर अवैध टपऱ्या व फेरी व्यवसाय सुरू असल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होत होते. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने गुरुवारी सकाळी कारवाई मोहीम हाती घेतली. मात्र, कारवाई सुरू होताच संबंधित टपरी चालक आणि फेरीवाल्यांनी अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आरडाओरडा केला. एका महिला फेरीवाल्याने माझी गाडी भरून घेतल्याशिवाय मी उठणार नाही, अशी भूमिका घेत थेट अतिक्रमण विभागाच्या वाहनासमोरच लोटांगण घातले.

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थित अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. अखेर संबंधित महिलेला समजावून सांगत परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार उपअभियंता तपन डंके यांच्या नियंत्रणाखाली अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांच्या माध्यमातून मोहीम राबविण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news