Solapur Electric Wire Theft: इलेक्‍ट्रिक वायर चोरणारी टोळी जेरबंद; पावणेसात लाखांचा मुद्देमाल हस्‍तगत

कन्‍स्‍ट्रक्‍शन साईटवरुन सहा लाखांची इलेक्‍ट्रिक वायर चोरणाऱ्या टोळीतील चौघांना विजापूर नाका पोलिसांच्‍या डीबी पथकाने जेरबंद केले
Solapur Electric Wire Theft: इलेक्‍ट्रिक वायर चोरणारी टोळी जेरबंद; पावणेसात लाखांचा मुद्देमाल हस्‍तगत
Published on
Updated on

सोलापूर : कन्‍स्‍ट्रक्‍शन साईटवरुन सहा लाखांची इलेक्‍ट्रिक वायर चोरणाऱ्या टोळीतील चौघांना विजापूर नाका पोलिसांच्‍या डीबी पथकाने जेरबंद केले. त्‍यांच्‍याकडून चोरीस गेलेल्या केबल वायरसह पावणे सात लाखांचा मुद्देमाल हस्‍तगत केला. पोलिसांनी ६० पेक्षा आधिक सीसीटीव्‍हींचे फुटेज तपासून त्‍यांना पकडले.

सर्फराज अ.वहाब पटवेघर (वय २२, रा. अमन चौक), अनिस उस्‍मान शेख ( वय २४, रा. नई जिंदगी), रेहान जमील शेख (वय २०, रा. नई जिंदगी) आणि अमीन युनुस शेख (वय २२, रा. नई जिंदगी) अशी संशयीत आरोपींची नावे आहेत.

केएलई शाळेजवळील कन्‍स्‍ट्रक्‍शन साईटवरुन सहा ऑगस्‍ट रोजी इलेक्‍ट्रिक वायरची चोरी झाली होती. विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास चव्‍हाण यांनी सहा.पोलिस निरीक्षक शितलकुमार गायकवाड यांच्‍या पथकास गुन्‍ह्याच्या तपासासंदर्भात सूचना केल्या होत्‍या. त्‍यानुसार तपासातून संशयीत आरोपींना अटक केली. त्‍यांच्‍याकडून चोरीतील इलेक्‍ट्रिक वायरचे बंडल, रिक्षा असा सहा लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्‍तगत केला.

ही कामगिरी शितलकुमार गायकवाड, आप्‍पा पवार, सचिन हार, अजय परदेशी, अमृत सुरवसे, राहुल विटकर, संतोष माने, शाबोद्दीन आबादीराजे, संतोष चानकोटी, रमेश कोर्सेगाव, स्‍वप्‍निल जाधव, श्रीरंग काशिद यांनी पार पाडली.

logo
Pudhari News
pudhari.news