Solapur News : निवडणूक खर्चाच्या तक्रारी प्रकरणी बैठकांचा फार्सच

, Election Expenditure, Solapur Election, Election Commission Complaints, Local Governance
Solapur Municipal Corporation
सोलापूर महापालिका
Published on
Updated on

सोलापूर : महापालिका निवडणुकीच्या खर्चासंदर्भातील तक्रार प्रकरणी कागदपत्रांमध्ये अद्यापही त्रुटी आहेत. विचारलेल्य प्रश्नांची संबंधित अधिकाऱ्यांकडे समाधानकारक उत्तरे नाहीत, असा आरोप करत निवडणूक खर्चाची चौकशी पुढील १० दिवसांत पूर्ण करून समाधानकारक खुलासा न केल्यास थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा इशाराही तक्रारदार नगरसेविका अर्चना वडनाल यांनी दिला.

निवडणुक खर्चाचा मुद्दा पाच-सहा महिन्यांपासून चर्चेत आहे. यासंदर्भात बैठकीत सहा प्रमुख मुद्द्यांवर संबंधितांकडून कागदपत्रे मागविण्यात आली होती. मात्र आवश्यक कागदपत्रे पूर्णपणे उपलब्ध न झाल्याने अनेक बाबींवर अद्याप प्रश्नचिन्ह कायम असल्याचे तक्रारदार नगरसेवकांनी सांगितले. गाड्यांच्या कामासाठी स्वतंत्र निविदा न काढता वार्षिक कंत्राटदार रणजीत ट्रॅव्हल्स यांना काम देण्यात आले. हा मुद्दा बैठकीत आला. संबंधित कामासाठी ६ हजारांचा दर कोणत्या आधारावर निश्चित करण्यात आला, याचेही स्पष्टीकरण मागण्यात आले. विविध कामांचे सुमारे २ कोटी १० लाखांचे बिल काढण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. हे आरोप उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, नगरसेविका अर्चना वडनाल, किल्लेदार, श्रद्धा पवार यांनी केले.

यावेळी विधी व न्याय समिती सभापती सत्यजित वाघमोडे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ. रत्नराज जवळगेकर , मुख्य लेखापरीक्षक सदानंद वाघमोडे, प्रभारी नगर अभियंता नीलकंठ मठपती, संबंधित अधिकारी तसेच तक्रारदार उपस्थित होते. पुढील १० दिवसांत तपासणी पूर्ण न झाल्यास निवडणूक आयोगाकडे तक्रार करू, असा इशारा तक्रारदारांनी दिला आहे.

हे आहेत तारांकित मुद्दे

  • जेवणाच्या बिलाबाबत किती कूपन छापण्यात आले, किती वाटण्यात आले आणि किती शिल्लक राहिले?

  • निवडणूक कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना कोणत्या कर्मचाऱ्याला कोणत्या नियमाप्रमाणे किती भत्ता दिला?

  • निवडणूक खर्चासाठी १० कोटींची मर्यादा असताना तो खर्च १४ कोटींपर्यंत कसा गेला?

  • मंडप खर्चाची २५ लाखांची मर्यादा ओलांडून तो ९० लाखांपर्यंत कसा प्रस्तावित करण्यात आला?

  • स्थायी समितीसमोर ५० लाख करण्यात आल्याचा आरोप. या रकमेतील बदलाचा आधार काय?, याची कागदपत्रे मागण्यात आली का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news