Solapur online fraud: वृध्दाची 68 लाखांची ऑनलाईन फसवणूक

शेअरमार्केटमधून जादा परताव्याचे आमीष
Online Fraud
Online FraudPudhari
Published on
Updated on

सोलापूर : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास जादा परताव्याचे आमीष दाखवून सोलापुरातील वृध्दाची 68 लाख 26 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. याबाबत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरण नागनाथ कोटा ( वय 66, रा. रंगराज नगर, मार्केट यार्ड पाठीमागे, सोलापूर) यांना फेसबुकवर शेअर मार्केट संदर्भात आयआयएफएल या कंपनीची जाहिरात आली. त्याव्दारे संपर्क केला असता व्हॉट्सॲपवर एल102 इन्व्हेस्टमेंट स्टॅटर्जी रिसर्ज इन्स्टिट्युट या ग्रुपमध्ये त्यांना सहभागी करुन घेतले. त्या गु्रपमध्ये बनावट लिंक पाठवून त्यातून डीएमए-आयआयएफएल हे ॲप्लिकेशन तसेच दुसऱ्या लिंकमधून 2026आयएफएल 10 हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करायला लावले.

आशिष (सर्व्हिस मॅनेजर ई112 आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लि. मो.नं ः 7487971418) प टिना मल्होत्रा (लिफ्ट सिक्युरिटीज मो.नं. 7304102975 व 9173897206) यांनी वेगवेगळ्या खात्यात फिर्यादीकडून 68 लाख 26 हजार रुपये घेतले. त्यानंतर त्यांनी घेतलेल्या शेअर्स व आयपीओची किंमत वाढल्याचेही दाखवले. परंतु परतावा घेण्याची वेळ आल्यावर एकही रुपया दिला नाही. 19 एप्रिल ते 21 मे 2026 दरम्यान त्यांच्याकडून पैसे घेण्यात आले. दरम्यान फसवणूक झाल्याचे लक्षात येताच किरण कोटा यांनी पोलिसांकडे धाव घेतली. सायबर पोलिसांनी शहानिशा करुन गुन्हा दाखल केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news