Solapur Electric Bus | शहरात लवकरच धावणार ई-बस : कोंड्याल

महापौर कार्यालयातील बैठकीत डेपो, चार्जिंगसह पायाभूत सुविधांचा आढावा
Solapur Electric Bus | शहरात लवकरच धावणार ई-बस : कोंड्याल
Published on: 
Updated on: 

सोलापूर : सोलापूर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि आधुनिक करण्याच्या दृष्टीने प्रस्तावित ई-बस सेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. ई-बस डेपोची उर्वरित कामे, चार्जिंग स्टेशन तसेच आवश्यक वीजपुरवठा आणि अन्य पायाभूत सुविधांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना महापौर विनायक कोंड्याल यांनी बैठकीत दिल्या.

महापौर कार्यालयात ई-बस सेवेसंदर्भात झालेल्या बैठकीत डेपोची सद्यस्थिती आणि प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, सभागृहनेते नरेंद्र काळे, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, माजी महापौर तथा नगरसेविका श्रीकांचना यन्नम, नगरसेवक गौतम कसबे, परिवहन उपक्रमाच्या नियंत्रण अधिकारी सारिका आकुलवार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

ई-बस डेपोमध्ये बस चार्जिंग स्टेशन, दुरुस्ती व देखभाल सुविधा, पार्किंग, ड्रेनेज, अग्निसुरक्षा, सीसीटीव्ही, हायमास्ट प्रकाश व्यवस्था, प्रवेशद्वार, अंतर्गत विद्युत व्यवस्था आणि ईव्ही चार्जिंग सुविधांची कामे करण्यात येत आहेत. या सर्व सुविधांचा प्रत्यक्ष बससेवा सुरू होण्यापूर्वी पूर्ण क्षमतेने वापर करता येईल, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

यावेळी परिवहन व्यवस्थापक इर्रणा वन्यालोल्लू, कर्मशाळा अधीक्षक गिरीश आंटद, कनिष्ठ अभियंता सहायक व्यंकटेश गुडशेलू, लेखापाल तथा पीएम ई-बस नोडल अधिकारी गणेश काळे, मुख्य वाहतूक निरीक्षक सतीश गुंड यांच्यासह परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.एचटी वीजजोडणीला प्राधान्यई-बसच्या चार्जिंगसाठी आवश्यक एचटी वीजजोडणी आणि वीजपुरवठ्याचे ऊर्जीकरीकरण महत्त्वाचे आहे. त्यामुळे संबंधित कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. तसेच ईव्ही चार्जिंग यंत्रणेची चाचणी, कार्यान्वयन आणि प्रत्यक्ष संचालनासाठी आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.

डेपोतील उर्वरित पायाभूत सुविधा पूर्ण करून ई-बस सेवा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी परिवहन विभागाकडून कार्यवाहीला गती देण्यात येत आहे. ई-बस सेवेमुळे सोलापूरकरांना सुरक्षित, आरामदायी आणि आधुनिक सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news