NEET paper leak: ‘नीट‌’ पेपरफुटीप्रकरणी ‌‘डीवायएफआय‌’चे आंदोलन

पूनम गेट येथे झालेल्या या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या प्रतिमांचे दहन करण्यात आले
NEET paper leak: ‘नीट‌’ पेपरफुटीप्रकरणी  ‌‘डीवायएफआय‌’चे आंदोलन
Published on
Updated on

सोलापूर : देशातील परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ यांच्या वतीने (डीवायएफआय) सोलापुरात जोरदार आंदोलन करण्यात आले. पूनम गेट येथे झालेल्या या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या प्रतिमांचे दहन करण्यात आले.

नीट पेपर फुटीप्रकरणी डीवायएफआयचे जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. एनटीए यंत्रणा रद्द करा, नीटची फेरपरीक्षा पारदर्शक आणि गोपनीय पद्धतीने घ्यावी, विद्यार्थ्यांच्या आत्महत्येस जबाबदार शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, चौकशी नको, थेट अटक करावी अशा घोषणा देण्यात आल्या.

या आंदोलनात युवा महासंघाचे जिल्हा कोषाध्यक्ष बाळकृष्ण मल्याळ, विजय हरसुरे, बालाजी गुंडे, राहुल बुघले, सुनील आमाटी, अप्पाशा चांगले, किशोर झेंडेकर, योगेश अकीम, दिनेश बडगू, चंटी बीटला, विजय साबळे, शाम आडम, मल्लेशाम कारमपुरी, नानी माकाम, कुमार येलगेटी, अभिजीत निकंबे, गुंडप्पा डक्का, सय्यद शहापूरे, सद्दाम बागवान यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news