Solapur accident: डंपरच्या धडकेत एसटीतील दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू

सोलापूर-गाणगापूर मार्गावरील घटना; डंपर उलटून पेटला
accident
accidentfile photo
Published on
Updated on

अक्कलकोट : गाणगापूरहून सोलापूरकडे जाणाऱ्या सोलापूर आगाराच्या बसला वृद्धेवाडीजवळ समोरून येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली. यात बसमधील चंद्रकला लाडप्पा हडपद (वय 16, रा. चिक्केहळी, ता. अक्कलकोट ) व चांगदेव श्रीरंग लवटे (वय 78, रा. डुक्करवाडी, तालुका भूम, जिल्हा धाराशिव) हो दोघे जागीच ठार झाले तर आठ प्रवासी जखमी झाले.

जखमींना उपचाराकरिता अक्कलकोटच्या ग्रामीण तर काहींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. एसटीला धडक दिल्यानंतर डंपर उलटून पेटला. चालकाने भरधाव वेगाने वाहन चालविल्याने बसच्या उजव्या बाजूला डंपरची (एमएच 07, एजे 3960) धडक बसली. या बस मध्ये 44 प्रवासी प्रवास करत होते.

या घटनेची फिर्याद अक्कलकोटच्या दक्षिण पोलिस ठाण्यात एसी चालक ज्योतिराम दिलीप चव्हाण यांनी दिली. डंपर चालक अजयकुमार अर्जुन यादव (रा. पद्मा, जि. पलामु, राज्य झारखंड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक माने करीत आहेत.

जखमी प्रवाशांची नावे

मनोज मधुकर उगले (वय 31, वाशिम), शिवानंद चंद्रकांत बजे (वय 40, सदलापूर ता. अक्कलकोट ), लाडप्पा मल्लाप्पा हडपद (वय 39 , रा . चिक्केहळ्ळी), अमिना इब्राहिमसाहब मोतीहार (वय 50, रा. माशाळ), विठ्ठल मनोज उगले (वय 4, रा. वाशिम), गजानन पंडित कोलंदरे (वय 16, रा. वाशिम), निकिता पंडित कोलंदरे (वय 18, रा. वाशिम), प्रियंका लाडापा हडपद (वय 11, रा. चिक्केहळळी).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news