Solapur News : जिल्ह्यात दुष्काळ; जि.प. सदस्य, अधिकारी मात्र सुट्टीत मश्गुल

सर्वसाधारण सभा कोरमअभावी तहकूब, पाणीटंचाईच्या उपाययोजनांसाठी चर्चेची गरज असताना दांडी
Solapur ZP
Solapur ZPPudhari
Published on: 
Updated on: 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीत अतितातडीच्या पाणीटंचाईच्या उपाययोजनांसाठी लोकप्रतिनिधींच्या सक्रिय सहभागाची गरज असताना जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी गुरुवारी आयोजित सर्वसाधारण सभेकडे पाठ फिरविली. त्यामुळे ही सर्वसाधारण सभा तहकूब करण्याची नामुष्की प्रशासनावर आली.

एकीकडे जिल्ह्यात दुष्काळचे चटके तीव्र होत असताना जनसेवेचा आव आणणारे जिल्हा परिषद सदस्य, लाखो रुपये पगार घेणारे अधिकारी अजूनही दीपावली सुट्टीतून बाहेर यायला तयार नसल्यामुळे जनतेतून संताप व्यक्त होत आहे. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव सभागृहात गुरुवारी (दि.१२) दुपारी दोन वाजता आयोजित सभेला एकाही सदस्याने हजेरी लावली नाही. विशेष म्हणजे विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर ही पहिलीच सर्वसाधारण सभा होती.

या सभेत जिल्ह्यातील विविध विकासकामांसह दुष्काळी परिस्थिती आणि टंचाई उपाययोजनांवर चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, दिवाळीचा उत्साह अद्याप कायम असल्याने अनेक सदस्यांनी अध्यक्षांकडे सभा पुढे ढकलण्याची विनंती केली होती. विशेष म्हणजे, महिला सदस्यांनीही यासाठी पुढाकार घेतला होता.

विशेष तपशील...

दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे बहुतांश अधिकारी आणि कर्मचारी रजेवर असल्याने सभेची तारीख पुढे ढकलण्याबाबत चर्चा.

नियोजित वेळेनुसार दुपारी दोन वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कौशल जैन हे तिघेच सभागृहात दाखल.

सभागृहात सदस्यांची उपस्थितीच नव्हती. केवळ दोन अधिकारी आणि चार कर्मचारी उपस्थित.

अखेर कोरम पूर्ण होऊ न शकल्याने सभा तहकूब करण्याचा निर्णय.

तहकूब सभा आता २० नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता घेण्यात येणार.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.