Pandharpur News : विठ्ठल मूर्तीवर कोटिंग पूर्ण

आज वज्रलेपन प्रक्रिया; भाविकांनी टेकले नामदेव पायरीवर डोके
Pandharpur Vitthal Rukmini Temple
Pandharpur Vitthal Rukmini TemplePudhari
Published on
Updated on

पंढरपूर : श्री विठ्ठल व रुक्मिणीच्या मूर्तीच्या चरणाची झालेली झिज भरून काढण्यासाठी मूर्तींचे जतन व संवर्धन करण्याचे काम मंदिर समितीने भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी सकाळपासून सुरू केले. पहिल्या दिवशी मूर्तीचे स्कॅन करण्यात आले. यानंतर मूर्तींवर संरक्षक आवरण (कोटिंग) तयार करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. आज, गुरुवारी वज्रलेपन प्रक्रिया करण्यात येणार आहे.

सकाळी संवर्धनाच्या प्राथमिक टप्प्यात मूर्तींची शास्त्रीय पद्धतीने संपूर्ण स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर आवश्यक तांत्रिक प्रक्रियेनुसार मूर्तींवर संरक्षक आवरण देण्याचे काम करण्यात आले आहे. संपूर्ण प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक व शास्त्रीय पद्धतीने पार पाडली जात आहे. मूर्तींच्या प्राचीन स्वरूपास, पावित्र्यास अथवा धार्मिक परंपरांना कोणतीही बाधा निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात येत असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

मूर्ती संवर्धनासाठी मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी रोजोपचार सुरूच आहेत. देवाच्या पारंपरिक रीतीरिवाजात कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचे सदस्या ॲड. माधवी निडे यांनी सांगितले.

मंदिर २६ पासून सुरू

मूर्तीवर वज्रलेप करण्यासाठी तीन दिवस मंदिर दर्शनासाठी बंद आहे. त्यामुळे भाविकांना पदस्पर्श नव्हे, तर मुखदर्शन देखील बंद आहे. त्यामुळे आलेले भाविक हे नामदेव पायरी येथून दर्शन घेत आहेत. अनेक भाविक कळस दर्शनावर समाधान मानत आहेत. २६ सप्टेंबरपासून मंदिर भाविकांसाठी पूर्ववत खुले होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news