Solapur Drought : जिल्‍ह्यात दुष्काळाची दाहकता वाढणार

दीड लाख लोकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा : जिल्ह्यातील ५७ गावे, २२५ वाड्या-वस्‍त्‍या बाधित
Solapur Drought
Solapur Drought : जिल्‍ह्यात दुष्काळाची दाहकता वाढणार
Published on
Updated on

सोलापूर : जिल्‍ह्यातील ५७ गावे आणि २२५ वाड्या, दीड लाख लोकांना ४७ टँकरद्वारे सध्या पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ही संख्या येत्‍या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाज जिल्‍हा परिषदेच्‍या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने व्‍यक्‍त केला आहे. त्‍यामुळे येत्‍या काळात जिल्‍ह्यात दुष्काळाची दाहकता वाढणार आहे.

पावसाळा संपत आला आहे. अद्यापही चांगला पाऊस न पडल्‍याने पाण्याची पातळी खालावली आहे. त्‍यामुळे गावे, वाड्या, वस्‍त्‍यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ही परिस्‍थिती असेच राहिल्‍यास जिल्‍ह्यातील शेकडो गावे आणि वाड्या, वस्‍त्‍यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार आहे. दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन जिल्‍हा परिषदेच्‍या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने पूर्वतयारी केली असून, मागणी येईल, येथे टँकरचे देण्याची तयारी दर्शविली आहे.

तालुकानिहाय बाधित गावांची संख्या

अक्‍कलकोट - ३, बार्शी - १३, करमाळा - ९, माढा - ९, मंगळवेढा - ४, माळशिरस - ४, उत्तर सोलापूर - ३, सांगोला - ११ असे एकूण ५७ गावांत ४७ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.

पावसाअभावी जिल्‍ह्यात टँकरच्‍या मागणीत वाढ होत आहे. सध्या ४७ टँकरद्वारे जिल्‍ह्यातील दीड लाखांपेक्षा जास्‍त नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ही संख्या येत्‍या काळात वाढणार आहे.
प्रसाद काटकर, प्रभारी कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा, जि. प. सोलापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news