Solapur News: वाळलेल्या झाडांचे सांगाडे बनले धोकादायक

वादळामुळे झाडे तुटून अपघाताची शक्यता; पावसाळ्यापूर्वी ही झाडे तोडण्याची गरज
Solapur News: वाळलेल्या झाडांचे सांगाडे बनले धोकादायक
Published on
Updated on

सोलापूर : शहरातील काही रस्त्यांच्या कडेला जुने असलेली झाडे वाळलेली आहेत. या वाळलेल्या झाडांचे सांगाडे गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्याच्या कडेला उभे आहेत. हे वाळलेले सांगाडे काढण्याची तसदी महापालिकेच्या प्रशासनाकडून अनेक दिवसांपासून झाली नाही. वारा वादळाच्या घटनेत हे वाळलेल्या झाडांचे सांगाडे या रस्त्यावरून ये - जा करणाऱ्या नागरिकांच्या अंगावर पडून दुर्दैवी घटनेची वाट महापालिका प्रशासन बघते की काय, अशी शंका या वाळलेल्या झाडांच्या सांगाड्याकडे पाहिले की लक्षात आल्याशिवाय राहात नाही.

येथील विभागीय रेल प्रबंधक कार्यालयासमाेरून जुना एम्प्लॉयमेंट चौकाकडे जाणाऱ्या या रस्त्याच्या बाजूला उत्पादन शुल्क कार्यालयाच्या संरक्षक भिंतीला लागून व पुढेही चार ते पाच ठिकाणी वाळलेल्या झाडांचे सांगाडे गेल्या दोन-चार वर्षापासून उभे आहेत. या वाळलेल्या झाडांचे सांगाडे तोडून काढण्याची तसदी महापालिकेच्या प्रशासनाकडून घेतली नाही. म्हणून, या वाढलेल्या झाडाचे सांगाडे आजही उभेच आहेत. सध्या अवकाळीचे दिवस आहेत.

या दिवसांत वारा वादळ मोठ्या प्रमाणात सुटत असतो. मोठ्या प्रमाणावर सुटलेला वारा आणि वादळामध्ये हे वाळलेले झाडांचे सांगाडे तुटून रस्त्यावर पडू शकते. ते पडल्यास येथून ये - जा करणाऱ्या नागरिकांवर किंवा अन्य वाहनावर मोडून पडल्यास या घटनेत एखादी दुर्दैवी घटना घडू शकते.

ही दुर्दैवी घटना घडण्याच्या अगोदरच महापालिका प्रशासनाकडून येथील झाडाचे सांगाडे काढून टाकण्याची गरज आहे. दुर्दैवी घटना घडण्याची वाट महापालिका प्रशासन बघते की काय, अशी शंका या वाळलेल्या झाडांकडे पाहून आल्याशिवाय राहत नाही. ही वाळलेली झाडे खूप उंच आहेत. शिवाय याचे बुंदेही जाड आहेत. जोराचा वारा वावटळ सुटल्यास ते मोडून पडल्यास मोठी दुर्दैवी घटना घडल्याशिवाय राहत नाही.

वाळलेली झाडे तुटून मोडून मोठी दुर्दैवी घटना घडण्यापेक्षा त्याच्या अगोदरच महापालिकेच्या प्रशासनाने शहरातील ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे वाळलेली झाडे आहेत. अशी सर्व झाडांची मोजणी करून ती जमीनदोस्त करण्याचे प्रयत्न पालिका स्तरावरून होणे आवश्यक आहे. अन्यथा ती झाडे तसेच उभे राहिल्यास भविष्यात दुर्दैवी घटना घडल्याशिवाय राहणार नाही. ती घडण्यापूर्वीच वाळलेल्या झाडांचे सांगाडे जमीनदोस्त करण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news