Solapur News : डॉ. वळसंगकरांची सुसाईड नोट प्लांट केलेली

संशयित मनीषाच्या वकिलांचा आरोप, जबाबातील विसंगतीवर ठेवले बोट
Dr. Valsangkar Death Case |
डॉ.शिरीष वळसंगकर(File Photo)
Published on
Updated on

सोलापूर ः प्रसिध्द न्यरोफिजिशिअन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहलेली सुसाईड नोट प्लांट केलेली असू शकते असा आरोप संशयित आरोपी मनीषा मुसळे-मानेचे वकील ॲड. प्रशांत नवगिरे यांनी केला. सुसाईड नोटबाबत सर्वांच्या जबाबातील विसंगतीवर त्यांनी बोट ठेवत हा आरोप केल्याने या खटल्याला नवे वळण लागण्याची शक्यता आहे.

डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा मुसळे-माने हिने न्यायालयात दोषमुक्तीचा अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सोमवार (दि. 23) पासून युक्तिवादास सुरुवात झाली. जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांच्या न्यायालयात दोन्ही पक्षाच्या वकिलांनी सोमवारी युक्तिवाद केला. मनीषाचे वकील ॲड. प्रशांत नवगिरे यांनी 17 व 18 एप्रिल 2025 या दोन दिवसांच्या घटना न्यायालयासमारे मांडल्या. 17 रोजी मनीषाने मेल पाठवला होता. त्यानंतर लगेच माफीनामाही दिला. त्यामुळे केवळ दोन दिवसात तिच्यामुळे डॉ. शिरीष यांनी आत्महत्या केली, असे म्हणता येणार नाही.

मनीषा दबाव टाकत असेल तर डॉ. शिरीष यांच्याकडे अनेक पर्याय होते. तिला कामावरून काढून टाकले असते, तिच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली असती परंतु तसे न करता उलट तिची समजूत काढली त्यामुळे मनीषा आणि डॉ. शिरीष यांच्यात टोकाला जाण्याइतपत वाद नव्हता असा युक्तिवाद त्यांनी केला. डॉ. शिरीष यांची सुसाईड नोट ही प्लांट केलेली असू शकते असा आरोपही त्यांनी केला. सरकार पक्षाच्या म्हणण्यानुसार पोस्टमार्टम करताना सुसाईड नोट कपड्यांमध्ये सापडली. परंतु डॉ. शिरीष यांचे पार्थिव पोस्ट मार्टमला देताना कपडे काढून घेण्यात आले होते आणि ते पोलिस स्टेशनला जमा होते. सुसाईड नोटबाबत सगळ्यांचे जबाब वेगवेगळे आहेत. त्यामुळे सुसाईड नोट कधी आणि कुठे सापडली याबाबत साशंकता असल्याने ती प्लांट केली होती का, असा प्रश्न ॲड. प्रशांत नवगिरे यांनी उपस्थित केला. सरकार पक्षाची बाजू मांडताना ॲड. आनंद कुर्डुकर यांनी मनिषाच्या विरोधात सरकार पक्षाकडे सबळ पुरावे असल्याचे सांगितले.

मनीषाच्य विरोधात एफआयआर मध्ये थेट आरोप आहे. तिने पाठवलेल्या मेलमुळेच डॉ. शिरीष यांनी आत्महत्या केली असून तिचा अर्ज नामंजूर करावा, अशी मागणी केली. या युक्तिवादावेळी संशयित आरोपी मनीषा मुसळे-माने ही न्यायालयात हजर होती तर वळंगकर कुटुंबीयातील कोणीही सदस्य उपस्थित नव्हते. याबाबत मंगळवारी (दि. 24) पुन्हा सुनावणी होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news