Dr. Shirish Valsangkar Death Case: मनीषाचा दोषमुक्तीचा अर्ज रद्द करा

सरकार पक्षाने केली मागणी; 21 ला होणार पुढील युक्तीवाद
Dr. Shirish Valasangkar Death Case |
Dr. Shirish Walsangkar Death casePudhari Photo
Published on
Updated on

सोलापूर : सोलापुरातील प्रसिध्द न्युरो फिजिशिअन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्याप्रकरणातील संशयीत आरोपी मनीषा मुसळे मानेच्या दोषमुक्तीच्या अर्जावर शुक्रवारी (दि.7) सरकार पक्षाने म्हणणे सादर केले. आता 21 नोव्हेंबर रोजी दोन्ही बाजूंकडील युक्तीवाद होणार आहे. त्यानंतर दोषमुक्तीच्या अर्जावर सुनावणी होईल.

डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणात संशयित आरोपी असलेल्या मनीषा मुसळे-माने हिने या गुन्हयात दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयात सादर केला आहे. त्याच बरोबर वळसंगकर कुटुंबियांसोबतच इतर काही लोकांचे मोबाईल सीडीआर जतन करण्याची मागणी केली होती. त्यावर न्यायालयाने 27 ऑक्टोबर रोजी सुनावणी घेतली. सरकार पक्षाने म्हणणे सादर करण्यासाठी मुदत मागितली. त्यानंतर शुक्रवारी (दि.7) अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश जयदिप मोहिते यांच्या न्यायालयात सुनावणी पार पडली. दोषमुक्तीचा अर्ज आणि सीडीआर बाबत सरकारी पक्षाने तसेच तपास अधिकाऱ्याचे म्हणणे सादर केले.

मनीषा वकिलांनी केलेले तीनही अर्ज फेटाळण्याची मागणी सरकार पक्षाने केली. अर्जात नमूद सर्व साक्षीदारांचे सीडीआर व एसडीआर मिळवण्याकरिता पत्रव्यवहार केला असून सदर सीडीआर व एसडीआर प्राप्त होताच ते न्यायालयात सादर करण्यास तयार आहेत. त्यामुळे तो अर्ज फेटाळावा तसेच मनीषा मोबाईल देण्यात येऊ नये, अशी हरकत सरकारी वकिलांनी घेतली. दरम्यान न्यायाधीश जयदीप मोहिते यांनी दोन्ही बाजुंना युक्तीवादासाठी 21 नोव्हेंबर ही तारीख दिली. या खटल्यात मनीषा मुसळे माने हिच्या तर्फे ॲड. प्रशांत नवगिरे तर सरकारतर्फे ॲड. प्रदीपसिंह रजपूत हे काम पाहत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news