Dr. Rupanwar Death Case: डॉ. रुपनवर यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ नातेपुतेत रास्ता रोको

मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी
Dr. Rupanwar Death Case: डॉ. रुपनवर यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ नातेपुतेत रास्ता रोको
Published on
Updated on

नातेपुते : सातारा जिल्ह्यतील फलटण रुग्णालयातील डॉ. राजेंद्र जगन्नाथ रुपनवर यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अधिकारी व संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी मंगळवारी नातेपुते येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी आमदार उत्तमराव जानकर, माजी आमदार राम सातपुते, माजी आमदार ॲड. रामहरी रुपनवर, मार्केट कमिटीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, जि.प.सदस्य गौतम माने, ॲड. समाधान पाटील, ज्ञानदेव पाटील, माऊली पाटील यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते.

माजी आमदार राम सातपुते म्हणाले, डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या वैद्यकीय अधीक्षक, उपसंचालक व इतर घटनेला जे-जे लोक जबाबदार आहेत. त्या सर्वांवर कडक कारवाई झाली पाहिजे. मयतास न्याय मिळाला पाहिजे. आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल संबंधितांना अटक करून फास्टट्रॅक कोर्टात केस चालवली पाहिजे.

माजी आमदार ॲड. रामहरी रुपनवर म्हणाले, की” मृत्यूची चौकशी झाली पाहिजे. डॉ. राजेंद्र हे बरे झाले होते. नातेवाईकांना म्हणाले मी आता बरा झालो आहे. जबाब घेतला आणि जबाबानंतर त्यांना मृत्यू घोषित केले. मोठ्या नेत्याच्या पी. ए. ला सर्टिफिकेट दिले नाही, म्हणून बडतर्फ केले गेले आहे. मंत्र्याच्या पी.ए.ला अटक झाली पाहिजे. याप्रसंगी मांडवे येथील बंडू पालवे, ॲड. शरद रुपनवर, सोमा पिसे, हरणावळ यांनी मनोगत व्यक्त केले. रास्ता रोको आंदोलनानंतर उपस्थित हजारो लोक आंदोलन करून आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी मार्गस्थ झाले.

मागील दोन महिन्यांपासून डॉ. राजेंद्र रुपनवर हे समाज माध्यमावर याविषयी लिखाण करीत होते. आपल्या भावना व्यक्त करीत होते. या प्रकरणातील उपसंचालक डॉ. भगवान पवार, मंत्र्यांचा पी.ए. प्रसाद कोंडे- देशमुख व डॉ. लीला मदने या तिघांनी छळ करून त्यांना बडतर्फ करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे. या तिघांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. हा व्यवस्थेचा बळी आहे.
- उत्तमराव जानकर, आमदार माळशिरस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news