Solapur News : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक रविवारीच

मध्यवर्ती समितीचा मोठा निर्णय; एक बेस, एक टॉप साऊंडचा होणार वापर
Solapur News
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक रविवारीच
Published on
Updated on

सोलापूर ः शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणूक मंगळवारी नव्हे, तर परंपरेनुसार रविवारीच (दि. 19) काढण्यावर शिक्कामोर्तब झाले. मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे विश्वस्त राजाभाऊ सरवदे व राजाभाऊ इंगळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

यापूर्वी मिरवणूक मंगळवारी (दि. 21) काढण्याचा निर्णय झाला होता; मात्र लोकभावना विचारात घेऊन तो बदलण्यात आला. मिरवणुकीत शिस्त राखण्यासाठी एक बेस, एक टॉप साऊंड सिस्टीमचाच वापर केला जाईल. मिरवणूक मार्गावरील प्रत्येक चौकात प्रत्येक मंडळाला केवळ 15 मिनिटांचा वेळ देण्यात येईल. रस्ता अडवून धरणाऱ्या मंडळांवर कारवाईच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. मिरवणुकीत मंत्री किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा गाड्यांचा ताफा येणार नाही. मान्यवर पायी येऊन अभिवादन करतील. सकाळी 11.30 वाजता सुरू होणाऱ्या या मिरवणुकीसाठी एक मार्ग, एक परवाना हे धोरण राबवले जाणार आहे. यामुळे सर्व मंडळांना समान संधी मिळेल आणि अडथळे दूर होतील, असा विश्वास समितीने व्यक्त केला आहे. याचवेळी पुतळा परिसरातील मंडपाचे पूजनही करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news