

सोलापूर : आगामी दसरा व दिवाळी या महत्त्वापूर्ण आणि मोठ्या सण उत्सवाच्या दरम्यान प्रवाशांना गावाकडे जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाच्या वतीने देशातील विविध ठिकाणी 230 विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय रेल्वे विभागाच्या वरिष्ठ स्तरावरुन घेतला आहे.
लातूर - हडपसर विशेष गाड्या (74 फेर्या) आहेत. यामध्ये गाडी क्रमांक 01429 विशेष गाडी 26 सप्टेंबर ते 28 नोव्हेंबरपर्यंत आठवड्यातील सोमवार, मंगळवार, बुधवार व शुक्रवारी लातूरातून सकाळी 9.30 वाजता सुटून याच दिवशी दुपारी 3.30 वाजता हडपसरला पोहोचेल. गाडी क्रमांक 01430 ही विशेष गाडी 26 सप्टेंबर ते 28 नोव्हेंबरपर्यंत दर सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवारी हडपसर येथून दुपारी 4.05 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 9.20 वाजता लातूरला पोहोचेल. या गाड्यांना हरंगुल, मुरुड, धाराशिव, बार्शी टाउन, कुर्डुवाडी, जेउर आणि दौंड येथे थांबा असणार आहे.
एलटीटी मुंबई - लातूर साप्ताहिक विशेष (20 फेर्या) यामध्ये गाडी क्रमांक 01007 साप्ताहिक विशेष 28 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत दर रविवारी एलटीटी मुंबईहून रात्री 12.55 वाजता सुटून ती त्याच दिवशी दुपारी 1.30 वाजता लातूरला पोहोचेल. तर गाडी क्रमांक 01008 साप्ताहिक विशेष 28 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत दर रविवारी दुपारी 4 वाजता लातूरहून सुटेल आणि दुसर्या दिवशी सकाळी 4.50 वाजता एलटीटी मुंबईला पोहोचेल. या गाड्यांना ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी आणि धाराशिव येथे थांबा असणार आहे.
दौंड - कलबुर्गी अनारक्षित आठवड्यातून 5 दिवस विशेष (96 फेर्या आहेत. यामध्ये गाडी क्रमांक 01421 अनारक्षित विशेष 26 सप्टेंबर ते 1 डिसेंबरपर्यंत दर सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार व शनिवारी दौंड येथून सकाळी 5 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी 11.20 वाजता कलबुर्गी येथे पोहोचेल. (48 फेर्या) यामध्ये गाडी क्रमांक 01422 अनारक्षित विशेष 26 सप्टेंबर ते 1 डिसेंबरपर्यंत दर सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार व शनिवारी कलबुरगि येथून दुपारी 4.10 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 10.20 वाजता दौंड येथे पोहोचेल. तर दौंड - कलबुर्गी अनारक्षित दोन आठवड्यातील विशेष गाड्या आहेत.
गाडी क्रमांक 01425 अनारक्षित विशेष ट्रेन 25 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत दर गुरुवार व रविवारी दौंडहून सकाळी 5.00 सुटेल व याच दिवशी सकाळी 11.20 वाजता कलबुरगिला पोहोचेल. गाडी क्रमांक 01426 अनारक्षित ट्रेन 25 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत दर गुरुवार व रविवारी कलबुरगि येथून रात्री 8.30 वाजता सुटेल आणि दौंडला दुसर्या दिवशी सकाळी 2.30 वाजता पोहोचेल. या गाड्यांना भिगवण, पारेवाडी, जेऊर, केम, कुर्डुवाडी, माढा, मोहोळ, सोलापूर, टिकेकरवाडी, होटगी, अक्कलकोट रोड, बोरोटी, दुधनी आणि गाणगापूर रोड येथे थांबा असणार आहे.
रेल्वेचा लाभ घेण्याचे आवाहन
भारतात दसरा आणि दिवाळी हे सण मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येते. या काळात प्रवाशांची सोय व्हावी या उद्देशाने मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने शेकडो गाड्यांची सोय केली आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन सोलापूर विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.