School Closure Solapur | अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्हयातील सहा तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर

सिना कोळेगांव, चांदणी, खासापूरी प्रकल्पातून अतिरिक्त जलसाठा तसेच भोगावती नदीमधून सिना नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
School Closure Solapur
अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्हयातील सहा तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर Pudhari File Photo
Published on
Updated on

सोलापूर : अहिल्यानगर व धाराशिव जिल्हयात जास्त प्रमाणात झालेल्या पावसामुळे सिना कोळेगांव, चांदणी, खासापूरी प्रकल्पातून अतिरिक्त जलसाठा तसेच भोगावती नदीमधून सिना नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सदर परिस्थितीत सिना नदीकाठावरील तसेच लगतच्या गावांमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन पूराचा धोका उदभवण्याची शक्यता आहे त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी सुट्टीचा देण्याचा निर्णय घेतला.

सोलापूर जिल्हयामध्ये (ग्रामीण) आज दिवसभर सर्वच भागात पाऊस झाल्यामुळे व सिना नदीस आलेल्या पूर सदृश्य परिस्थितीमुळे सोलापूर जिल्हयातील उत्तर सोलापूर (ग्रामीण), माढा, करमाळा, मोहोळ, बार्शी, आणि अपर तहसिल कार्यालय, मंद्रुप, ता. दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व माध्यमाच्या शाळा व महाविद्यालय यांना दिनांक २३/०९/२०२५ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

School Closure Solapur
Solapur News: बसण्यासाठी येथे बाकड्याचीही सोय नाही

आपत्तीच्या पूर्वसुचनेवरुन, हवामान खात्याच्या अंदाजावरुन तसेच त्या-त्या भागातील स्थानिक परिस्थितीचा आढवा घेऊन, संपूर्ण जिल्हयाकरिता अथवा जिल्हयातील ठराविक क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्हयांच्या जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहे.अधिकारान्वये सोलापूर जिल्हयातील उत्तर सोलापूर (ग्रामीण), माढा, करमाळा, मोहोळ, बार्शी, आणि अपर तहसिल कार्यालय, मंद्रुप, ता. दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी शाळा व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विनादानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना दिनांक २३/०९/२०२५ रोजी सुट्टी करण्यात आली आहे.

School Closure Solapur
Solapur News: सांडव्यातून पाणी काढल्याने धोका टळला

शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून आपत्ती व्यवस्थापन चे कार्य करावे. २३ तारखेला दिलेल्या सुट्टीच्या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहुन स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे असा आदेश देखील देण्यात आलेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news