Solapur News: शाळांच्‍या सोयी-सुविधा तपासण्यात सोलापूर जिल्हा राज्‍यात अव्वल

जिल्हास्तरीय समितीने झेडपीच्‍या ५४ शाळांना दिल्‍या भेटी
Solapur ZP
Solapur ZPPudhari
Published on
Updated on

सोलापूर : उच्च न्‍यायालयाने जिल्‍हा परिषदेच्‍या शाळांना भेटी देऊन भौतिक सोयी-सुविधांची पाहणी करण्याचे आदेश दिले होते. त्‍यानुसार जिल्‍हास्‍तरीय समितीने ५४ शाळांना भेटी देऊन भौतिक सोयी-सुविधांची पाहणी केली. राज्‍यात सर्वाधिक भेटी या सोलापूर जिल्‍हा परिषदेच्‍या समितीने दिल्‍यामुळे सोलापूर जिल्‍हा शाळात अव्वल आल्‍याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे.

मे २०२६ अखेर सोलापूर जिल्ह्यातील तब्बल ५४ शाळांना भेटी देण्यात आल्या असून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही संख्या सर्वाधिक आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुमोटो जनहित याचिका क्र. ०१/२०१८ मध्ये दिलेल्या निर्देशांनुसार जिल्हा परिषद शाळांमधील उपलब्ध सुविधा, पायाभूत व्यवस्था आणि शैक्षणिक वातावरणाचा आढावा घेण्यासाठी जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समित्यांकडून नियमित शाळा भेटी घेऊन अहवाल सादर केला जात आहे.

या अहवालानुसार सोलापूरनंतर ठाणे जिल्ह्यात ४३, नंदुरबारमध्ये ४०, नाशिकमध्ये ३४ तर पुणे आणि चंद्रपूर जिल्ह्यांत प्रत्येकी २६ शाळांना भेटी देण्यात आल्या आहेत.

या सुविधांची केली पाहणी

सोलापूर जिल्ह्यात एप्रिल २०२५ ते एप्रिल २०२६ या कालावधीत सातत्याने शाळा भेटी घेण्यात आल्या. मार्च २०२६ मध्ये सर्वाधिक आठ शाळांची पाहणी करण्यात आली होती. या भेटीदरम्यान शाळांमधील इमारतींची स्थिती, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, वीज, वर्गखोल्या आणि इतर मूलभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध आहेत का, याची तपासणी करण्यासाठी शाळांना भेटी देण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्‍यानुसार शिक्षण विभागाच्‍या जिल्‍हास्‍तरीय समितीने सोलापुरातील ५४ शाळा तपासल्‍या. ही आकडेवारी इतर जिल्‍ह्यापेक्षा जास्‍त असल्‍याने सोलापूर जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
- कादर शेख, शिक्षणाधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news