Solapur District Bank Election : सातही दिग्गज नेत्यांचे सहनिबंधकांकडे अपिल

माजी मंत्री म्‍हेत्रे, मोहिते-पाटील, परिचारक, शिंदेसह सात नेत्यांचे समावेश
Solapur District Bank
Solapur District Bank
Published on: 
Updated on: 

सोलापूर : सोलापूर जिल्‍हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेतील अर्ज छाननीत निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्‍हा उपनिबंधक मुकुंद पवार यांनी माजी मंत्री सिद्धाराम म्‍हेत्रे, माजी आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आ. संजयमामा शिंदे, माजी आ. प्रशांत परिचारक यांच्‍यासह इतर दिग्गज नेत्‍यांचे अर्ज कलम ८८ अन्‍वये कारवाईमुळे अपात्र केले होते. त्‍याविरोधात या नेत्‍यांनी पुणे विभागीय सहनिबंधक यांच्‍याकडे अपील केले आहे. त्‍याची सुनावणी शुक्रवारी (दि. ६) होणार आहे.

जिल्‍हा बँकेचे बेकादेशीर कर्ज वाटप प्रकरणात अनेक दिग्गज नेत्‍यांवर कलम ८८ अन्‍वये चौकशी झाली, तसेच काही नेत्यांना कलम ११० अ मुळे निवडणूक निर्णय अधिकारी पवार यांनी अपात्र केले. त्‍यातील माजी मंत्री सिद्धाराम म्‍हेत्रे, माजी आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आ. संजयमामा शिंदे, माजी आ. प्रशांत परिचारक, माजी आ. दिलीप माने, कृषी उत्‍पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश हसापुरे, बबनराव आवताडे यांनी पुणे विभागीय सहनिबंधकांकडे अपील केले आहे.

माजी आ. पाटील, जगतापांचे अपील नाही

माजी आ. राजन पाटील, माजी आ. जयवंतराव जगताप आणि जिल्‍हा परिषदेच्‍या सदस्‍या रश्मी बागल यांनी विभागीय सहनिबंधक यांच्‍याकडे अपील केले नसल्‍याची माहिती समोर आली आहे. या सर्वांना अपील करण्यासाठी आज गुरुवारचा (दि. ५) शेवटचा दिवस असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.