

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज वाटपातील गैरप्रकारासंदर्भात मुंबईत होणार्या सुनावणी उपस्थित रहावे, यासाठी माढ्याचे माजी आ. बबनराव शिंदे, अक्कलकोटचे माजी आ. सिद्रामप्पा पाटील, करमाळ्याचे माजी आ. संजयमामा शिंदे यांच्यासह नऊ जणांना नोटीस देण्यात आली आहे. ही सुनावणी आज (बुधवारी) दुपारी मुंबईत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या समोर होणार आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 238 कोटींच्या नुकसानीस माजी संचालकांना महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 च्या कलम 88 नुसार जबाबदार धरण्यात आले आहे. ती रक्कम वसुलीचे आदेशही देण्यात आले होते. या विरोधात काही माजी संचालकांनी सहकार मंत्री पाटील यांच्याकडे अपील केले होते. पहिल्या सुनावणीत सहकार मंत्र्यांनी नुकसानीच्या रक्कम वसुलीला स्थगिती दिली होती. त्यानंतर आता दुसरी सुनावणी आज (बुधवारी) होत आहे. त्याबाबतचे पत्र सहकार मंत्रालयाचे कक्ष अधिकारी रोहित खरे यांनी काढले आहे.
यांनाही आली नोटीस
सांगोल्यातील शेकापचे नेते चंद्रकांत देशमुख, मंगळवेढ्याचे बबनराव आवताडे, सुरेखा ताटे, सांगोल्याच्या विद्या बाबर व सुनंदा बाबर, पंढरपुरातील सुनीता बागल यांना अपील अर्जावरील सुनावणीसाठी हजर राहण्याची नोटीस बजाविण्यात आली आहे.