Solapur News : जिल्‍हा बँकेच्‍या १६० हरकतींवर सुनावणी

सांगोल्‍यातील ६२, अक्‍कलकोट तालुक्‍यातील २२ संस्‍थांसह इतर तालुक्‍यांतील संस्‍थांचा समावे
Solapur district bank |
Solapur district bankPudhari File Photo
Published on: 
Updated on: 

सोलापूर : सोलापूर जिल्‍हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. त्‍यावर ३५५ हरकती आल्‍या आहेत. त्‍यातील १६० हरकतींवर मंगळवारी (दि.६) पुणे विभागीय सहनिबंधक दिग्विजय आहिरे यांच्‍यासमारे सुनावणी झाली आहे. यामध्ये सांगोल्‍यातील ६२, अक्‍कलकोट तालुक्‍यातील २२ संस्‍थांसह इतर तालुक्‍यांतील विविध संस्‍थांचा समावेश आहे.

सुनावणी दरम्‍यान सांगोला तालुक्‍यातील काही दूध संस्‍थांनी आपले म्‍हणणे मांडण्यासाठी उद्याचा दिवस मागितला आहे. त्‍यामुळे त्‍या संस्‍थांना म्‍हणणे मांडण्यासाठी पुणे विभागीय सहनिबंधक आहिरे यांनी वेळ दिला आहे. त्‍यामुळे सोमवारी आणि मंगळवारीच्‍या सुनावणी वेळ मागितलेल्‍या विविध संस्‍था तसेच सुनावणीतील उर्वरित संस्‍थेची सुनावणी बुधवारी (दि.७) सुनावणी होणार असल्‍याची माहिती पुणे विभागीय सहनिबंधक कार्यालयाने दिली आहे.

उर्वरित हरकतीवर आज सुनावणी

जिल्‍हा बँकेच्‍या प्रारूप मतदार यादीवर जिल्‍ह्याभरातून विविध गटातून जवळपास ३५५ हरकती घेण्यात आल्‍या आहेत. यातील सोमवारी (दि.५) १७०, मंगळवारी (दि.६) १६० हरकतींवर सुनावणी झाली आहे. उर्वरित २५ आणि म्‍हणणे मांडण्यासाठी वेळ मागितलेल्‍या दूध उत्‍पादक संस्‍था, इतर सोसाट्यांची बुधवारी (दि. ७) सुनावणी होणार आहे.

logo
Pudhari News
pudhari.news