Solapur District Bank Election : जिल्हा बँकेच्या नऊ जागांसाठी २२ जण निवडणूक रिंगणात

दहा जागा बिनविरोध : भाजपच्या समविचारी सहकार पॅनेल विरोधात मोहिते-पाटलांचे स्‍वाभिमानी शेतकरी पॅनेल
Solapur District Bank Election
Solapur District Bank ElectionPudhari
Published on: 
Updated on: 

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी मंगळवारी (दि.१७) प्रचंड नाट्यमय घडामोडी घडल्या. निवडणुकीतून दिग्गज नेत्‍यांनी माघार घेतल्याने सोसायटी मतदारसंघाच्‍या नऊ आणि ओबीसी प्रवर्गातील एक अशा दहा जागा बिनविरोध झाल्‍या. उर्वरित नऊ जागांसाठी २२ जण रिंगणात असून, भाजपच्या समविचारी सहकार पॅनेल विरोधात मोहिते-पाटलांचे स्‍वाभिमानी शेतकरी सहकारी पॅनेल असा सामना रंगणार आहे.

भाजपच्या समविचारी सहकार पॅनेलच्या अंतिम यादीसाठी हॉटेल बालाजी सरोवर येथे मंगळवारी दिवसभर दिग्गज नेत्यांची खलबते सुरू होती. त्यानंतर आ. सचिन कल्याणशेट्टी आणि माजी आ. राजन पाटील यांनी भाजपच्या सहकार पॅनेलची अंतिम यादी जाहीर केली.

अर्ज माघार घेण्याच्या नाट्यमय घडामोडीत माळशिरस सोसायटी मतदारसंघात शहाजीराव देशमुख, अर्जुनसिंह मोहिते-पाटील आणि ज्ञानराज पाटील यांचे अर्ज शिल्‍लक राहिल्‍याने तेथे निवडणूक लागली. सांगोला सोसायटी मतदारसंघातून नऊ जणांनी अर्ज मागे घेतले. तरीही त्‍या मतदारसंघात आ. बाबासाहेब देशमुख, संजय इंगोले यांचे अर्ज राहिल्‍याने निवडणूक लागली.

​या निवडणुकीतील सर्वात मोठी आणि खळबळजनक घडामोड म्हणजे, आ. सुभाष देशमुख, आ. समाधान आवताडे आणि आ. अभिजित पाटील यांच्‍यासह माजी आ. राम सातपुते, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, माजी महापौर शोभा बनशेट्टी यांच्‍यासह अनेक दिग्गजांनी शेवटच्या दिवशी माघार घेतली.

तीन आमदारांसह १४५ जणांची माघार

आ. सुभाष देशमुख, आ. समाधान आवताडे, आ. अभिजित पाटील यांच्यासह तब्बल १४५ उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे आता नऊ जागांसाठी २२ उमेदवार रिंगणात आहेत.

यशस्वी माघार अन्‌ उमेदवार बिनविरोध

अक्‍कलकोट तालुक्‍यातील सोसायटी मतदारसंघातून संजीव पाटील, विश्वेश्वर नागूर यांनी माघार घेतल्‍याने आ. सचिन कल्‍याणशेट्टी बिनविरोध

उत्तर सोलापूर तालुक्‍यातील सोसायटी मतदारसंघातून धनंजय भोसले, बाबासाहेब पाटील यांनी माघार घेतल्‍याने पृथ्वीराज माने हे बिनविरोध

करमाळा तालुक्‍यातील सोसायटी मतदारसंघातून सुभाष गुळवे यांनी माघार घेतल्‍याने शंभूराजे जगताप बिनविरोध

दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील सोसायटीतून भारती शिवदारे यांनी माघार घेतल्‍याने श्रीदीप हसापुरे यांची बिनविरोध

पंढरपूर तालुक्‍यातील सोसायटी मतदारसंघातून उमेश परिचारक, प्रणव परिचारक आणि कल्‍याणराव काळे यांनी माघार घेतल्‍याने माजी आ. प्रशांत परिचारक बिनविरोध

बार्शी तालुक्‍यातील सोसायटी मतदारसंघातून रणवीर राऊत यांनी माघार घेतल्‍याने आ. राजेंद्र राऊत बिनविरोध

मंगळवेढा सोसायटी मतदारसंघातून सुशील आवताडे यांनी माघार घेतल्‍याने सिद्धेश्वर आवताडे बिनविरोध

माढ्यातून रणजितसिंह शिंदे, भारत शिंदे आणि गणपतराव साठे यांनी माघार घेतल्‍याने यशवंत शिंदे बिनविरोध

मोहोळ सोसायटी मतदारसंघात विक्रांत पाटील यांचा एकच अर्ज राहिल्‍याने ते बिनविरोध, तसेच ओबीसी प्रवर्गात अजिंक्‍यराणा पाटील बिनविरोध

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.