सोलापूर: जिल्हा बँकेवर भरदिवसा सशस्त्र दरोडा; कोरफळे येथे दरोडेखोर जेरबंद

Solapur Robbery News | बार्शी तालुक्यातील सुर्डी येथील घटना
district bank robbery Surdi in Barshi taluka
बार्शी तालुक्यातील सुर्डी येथील जिल्हा बँकेच्या शाखेवर दरोडा टाकल्यानंतर नागरिकांनी गर्दी केली होती. Pudhari Photo
Published on
Updated on

बार्शी; पुढारी वृत्तसेवा: सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सुर्डी येथील जिल्हा बँकेच्या शाखेवर भर दिवसा तीन दरोडेखोरांनी बंदूक व कोयत्याचा धाक दाखवत दरोडा टाकून लाखो रुपयांची रोकड लंपास केली. मात्र, पोलिसांच्या तत्परतेमुळे त्या तिन्ही दरोडेखोरांना कोरफळे गावात अटक करण्यात यश आले आहे.

दरोडेखोरांनी दरोडा टाकून पळून जाताना लुटलेल्या रोकडची बँग गावाबाहेर गेल्यानंतर रस्त्यावर टाकली. आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पळून जाणाऱ्या दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून लोकांनी बँकेसमोर मोठी गर्दी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news