World Toilet Day : सोलापूर जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी

जागतिक शौचालय दिन : जिल्ह्यात पाच लाखांहून अधिक शौचालये तयार!​
Toilet
Toilet
Published on: 
Updated on: 

सोलापूर : स्वच्छ शौचालय – निरोगी जीवनाचा पाया, या संदेशासह संयुक्त राष्ट्रसंघाच्या मान्यतेने दरवर्षी १९ नोव्हेंबर रोजी 'जागतिक शौचालय दिनी' संपूर्ण जगात स्वच्छतेचा संदेश दिला जातो. यानिमित्त...

जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधत सोलापूर जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) आणि मुख्यमंत्री समृद्ध अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत ५ लाखांपेक्षा अधिक शौचालयांचे बांधकाम करण्यात आले असून, पात्र लाभार्थ्यांना ‘मागेल त्याला शौचालय' या उक्तीनुसार सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. तसेच प्रत्येक गावात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प यशस्वीपणे राबवले जात आहेत.​

जिल्ह्यात राबवल्या जाणाऱ्या या प्रभावी उपक्रमाबाबत माहिती देताना जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी सांगितले की, प्रशासनाच्या माध्यमातून गावोगावी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जात आहे. या संपूर्ण मोहिमेसाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ आणि प्रकल्प संचालक अमोल जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.​

जागतिक शौचालय दिनाचे महत्त्व व आरोग्याला प्राधान्य​

प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित व स्वच्छ शौचालय उपलब्ध होणे हा मूलभूत मानवी हक्क आहे. उघड्यावर शौचास जाण्याची प्रथा थांबवून अतिसार, कॉलरा, टायफॉईड यांसारख्या दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांना आळा घालणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. महिला, मुली, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना सुरक्षित स्वच्छतागृह मिळाल्यामुळे त्यांचा सन्मान व सुरक्षितता वाढली आहे.​

ग्रामपंचायतींची भूमिका व जनजागृतीसाठी घोषवाक्ये​गावागावात शाळा, अंगणवाडी, बाजारपेठ आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच गाव स्वच्छता टिकवण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढवणे यात ग्रामपंचायतींची भूमिका महत्त्वाची ठरत आहे.​
- सचिन जाधव, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.