Solapur dialysis unit: डायलेसिस युनिटचे काम अंतिम टप्प्यात

विमा रूग्णालयात होणार सोय; कामगारांना मिळणार लाभ
Solapur dialysis unit
Solapur dialysis unit
Published on
Updated on
आमसिद्ध व्हनकोरे

सोलापूर : होटगी रोडवरील राज्य कामगार विमा योजनेच्या रूग्णालयात डायलेसिसच्या युनिटला मंजुरी मिळाली आहे. येथे आधुनिक पध्दतीचे आठ मशीन दाखल झाल्या आहेत. यातील चार मशीन बसविण्यात असून अन्य चार बसवण्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे. आठ मशिनच्या डायलेसिस युनिटमुळे त्याचा लाभ शहर जिल्ह्यातील साखर उद्योगांसह अन्य कंपन्यातील कामगारांना होईल. किडनीच्या आजाराने त्रस्त कामगार असलेल्या रूग्णांना व त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांवर पूर्णपणे मोफत डायलेसिसचे उपचार केले जाणार आहेत.

येथील विमा रूग्णालयात अनेक नवनवीन बदल होत असून या आरोग्य संस्थेत किडनीच्या आजाराने त्रस्त कामगारांना त्यांच्या उपचारासाठी अनेक उपाययोजना आखल्या जात आहेत. येथे अत्याधुनिक पध्दतीच्या डायलेसिस युनिटसाठी आठ मशीन मंजूर आहेत. यातील चार मशीन बसवलेले असून अन्य चार मशीन बसवण्याचे काम देखील अंतिम टप्प्यात आहे. मुत्रपिंडाने त्रस्त रूग्णांचे (किडनी) नीट काम करत नसेल तर अशावेळी रक्तातील विषारी घटक बाहेर काढण्याची प्रक्रिया याद्वारे केली जाते.

ही प्रक्रिया या आजाराने त्रस्त रूग्णावर आठवड्यातून किमान तीन वेळा करावी लागते. या प्रक्रियेतून रक्ताचे शुध्दीकरण केले जाते. भविष्यात किडनीच्या आजाराने त्रस्त कामगार असलेल्या रूग्णांना अन्य ठिकाणी जाऊन डायलेसिससाठी खर्च करावा लागणार नाही. येथे ती महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून पूर्णपणे मोफत केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news