Solapur DCC Bank Election : माजी आ. माने, जगताप पिता-पुत्रासह नऊ जणांचे अर्ज दाखल

डीसीसी बँक निवडणूक : बुधवारी २५ जणांनी घेतले ६६ अर्ज
Solapur District Bank
Solapur District Bank
Published on: 
Updated on: 

सोलापूर : जिल्‍हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लागली आहे. अर्ज भरण्याच्‍या तिसऱ्या दिवशी म्‍हणजेच बुधवारी (दि.२८) माजी आ. दिलीप माने, जयवंतराव जगताप, जिल्‍हा परिषदेचे सदस्‍य पृथ्वीराज माने, शंभूराजे जगताप यांच्‍यासह नऊ जणांनी अर्ज दाखल केले.

जिल्‍हा बँकेसाठी सोमवारी (दि.२६) पासून अर्ज विक्री व दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. गेल्‍या तीन दिवसात चारशेपेक्षा जास्‍त जणांनी अर्ज खरेदी केले आहे. तर गेल्‍या दोन दिवसात १५ जणांनी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्यासाठी आता फक्‍त दोन दिवस उरले आहेत. या शेवटच्‍या दोन दिवसात जिल्‍हा उपनिबंधक कार्यालयात मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होणार आहे.

दरम्‍यान, बुधवारी विविध कार्यकारी सेवा सहकारी मतदारसंघातून जयवंतराव जगताप, शंभूराजे जगताप, दिलीप माने, पृथ्वीराज माने, धनंजय भोसले, महिला मतदारसंघातून राधा राजेंद्र सुरवसे, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून बिराप्पा इंगळे, भटक्‍या विमुक्‍त जमाती मतदारसंघातून हणमंत मासाळ, इतर मागासवर्गीय मतदारसंघातून भिमराव येडवे यांनी अर्ज दाखल केले. जिल्‍हा बँकेच्‍या निवडणुकीसाठी बुधवारी आ. सचिन कल्‍याणशेट्टी, आ. बाबासाहेब देशमुख, माजी आ. प्रशांत परिचारक, अमोल शिंदे, अनिकेत पाटील, रोहिणी तडवळकर, संजीव पाटील यांच्‍यासह अनेकांनी अर्ज खरेदी केले.

तीन दिवसात ४०८ अर्जांची विक्री

जिल्‍हा बँकेच्‍या निवडणुकीसाठी गेल्‍या तीन दिवसापासून अर्ज विक्री सुरु आहे. या तीन दिवसात ४०८ जणांनी अर्ज खरेदी केले आहे. तर फक्‍त १५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. अर्ज विक्रीसाठी आणि दाखल करण्यासाठी आता फक्‍त दोन दिवस बाकी असून, यामध्ये कितीजण उमेदवारी दाखल करतात, याकडे जिल्‍ह्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news